भारतात अनेक ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता यांची देव म्हणून पूजा केली जाते. रामाला तीन भाऊ होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण, रामाला एक बहीणही होती याची माहिती फारच थोड्यांना असेल.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे देवी शांता हिचे मंदिर आहे. या मंदिरात ती आपले पती ऋषी श्रृंग यांच्यासोबर विराजमान आहे. देशभरातून दूरदूरून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कुल्लू पासून ५० किमी अंतरावर हे मंदिर आहे.
शांताबद्दल अजुन एक कथा आहे, तिला अंगदेशाचा राजा रोमपद यांना दत्तक दिली होती. रोमपदची पत्नी वर्षिणी ही कौसल्येची बहीण म्हणजे रामाची मावशी होती. राजा रोमपद याला अपत्य नव्हते व ते अयोध्येला आले असताना राणी वर्षिणीने चेष्टेने तुझे अपत्य मला दे अशी मागणी राणी कौसल्या कडे केली. त्यामुळे शांता देवीला त्यांच्याकडे सोपविले व ती अंगदेशाची राजकुमारी बनली. ती वेद, कला, शिल्पशास्त्रात निपुण होतीच पण अत्यंत सुंदर होती.
एका कथेत असे सांगतात की, तिच्या जन्मानंतर अयोध्येत १२ वर्षे दुष्काळ पडला. हा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर दशरथ राजाने तिची रवानगी तिच्या मावशीकडे केली. त्यानंतर शांता परत कधीच अयोध्येला आली नाही. अंगदेश नरेश रोमपद म्हणजे वर्षीणीचा पती (शांताची मावशी) शांतेशी खेळण्यात मग्न असताना एक ब्राह्मण पावसाळ्यातील शेतीकामासाठी राजाची मदत मागण्यास आला पण राजाने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला. त्यामुळे रागावलेल्या इंद्राने तेथे पाऊस पाडलाच नाही. शेवटी श्रृंग ऋषींनी त्यावर उपाय म्हणून यज्ञ केला. नंतर पाऊस पडला. खूष झालेल्या राजा रोमपद शांतेचा विवाह या ऋषींबरोबर करून दिला. तिचे मंदिर तिच्या पतीसह बांधले गेले. शांता आणि तिचे पती ऋषी शृंगी यांचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या पेक्ष्या शांता ही वयाने बरीच मोठी होती.
अयोध्येचा राजा दशरथाला चार पुत्र होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, दशरथ राजाला एक मुलगी होती आणि ती या भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती. तिचे नाव होते शांता. ती कौसल्या राणीची मुलगी होती. एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षीणी अयोध्येत आले होते. त्यांना अपत्य नव्हते. एका चर्चेवेळी राजा दशरथांना ते समजले. आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला. दशरथाचा निर्ण ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षीणी प्रसन्न झाले. त्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. उत्तर रामायणात रामाने सीतेचा त्याग केल्याचे समजताच ती रामाला खूप रागे भरते, अशी आख्यायिका आढळून येते. हिमाचल प्रदेशमधील कुल्लूजवळ शांता देवीचे मंदिर आहे. ही शांता देवी श्रीरामांची बहीण असल्याचे सांगितले जाते.