Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १३, २०२२

Har Ghar Tiranga | गाडीवर तिरंगा लावण्यासाठी सरकारचे नवे नियम - प्रत्येकाने वाचा*


 Har Ghar Tiranga | 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५वा स्वतंत्र दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली असून, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या (Social Media) ‘डीपी’वर तिरंगा ठेवण्यास सांगितले आहे.
दरम्यान स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन जवळ आल्यानंतर अनेक जण गाड्यांवर तिरंगा लावून फिरत असतात. मात्र आता , गाडीवर तिरंगा लावण्यासाठी सरकारने काही नियम जारी केले आहेत   Har Ghar Tiranga | 

*पहा कसे आहेत नियम*

💫 सध्या अनेकांनी कार, बाईक किंवा अन्य वाहनांवर भारतीय ध्वज लावला आहे. वाहनांवर तिरंगा लावण्याचा त्यांचा हेतू चुकीचा असू शकत नाही, मात्र असं केल्यास आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.

🚓 कारण, भारतीय राष्ट्रध्वज गाडीच्या बोनेटवर किंवा हुडवर, टॉप आणि साइड  ट्रेन, बोट, तसेच विमानाच्या पाठीमागे लावता येत नाही. तसे केल्यास ते राष्ट्रध्वजाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते

💰 तसेच आपल्याला भारतीय ध्वज कायदा आणि नियमानुसार 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


गाडीवर तिरंगा कोणाला लावता येतो ? - राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, नायब राज्यपाल, पंतप्रधान व इतर कॅबिनेट मंत्री, केंद्रातील राज्यमंत्री व उपमंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपसभापती, तसेच लोकसभेचे उपसभापती, मुख्यमंत्री व इतर कॅबिनेट मंत्री, राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशातील राज्यमंत्री व उपमंत्री, राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष, राज्य व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे सभापती,  याचबरोबर विधान परिषदांचे उपाध्यक्ष, राज्य व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापती, भारताचे सरन्यायधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश  Har Ghar Tiranga | 
 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.