अमृत महोत्सवी वर्षात भाजपला त्यांची जागा दाखवू
खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन
2022 पासून संपूर्ण देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने काँग्रेसच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकार हे लुटारू सरकार असून, 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी केले.
Azadi ka amrut Mahotsav
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. नऊ ऑगस्ट पासून निघालेली ही यात्रा आज 13 ऑगस्ट रोजी वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहचली. यावेळी संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर बोलत होते. Har Ghar Tiranga
आजादी गौरव पदयात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आणि भारताच्या जडणघडणीतील काँग्रेसचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने काँग्रेसतर्फे निघालेली आजादी गौरव पदयात्रा उद्या दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.00 वाजेपासून शेगाव - खेमजई - टेमुर्डा- येन्सा- वरोरा जाजू हॉस्पिटल ते गांधी चौक - नंदोरी आंबेडकर चौक भद्रावती या मार्गे वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात दाखल झाली.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांच्या सह उपस्थिती होती.
Har Ghar Tiranga