Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २६, २०२२

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या जीवनातील काही खास आठवणी

💐 *ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दीर्घ आजाराने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा*




ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दीर्घ आजाराने निधनाने झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. तसेच, पोटात पाणी झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाची अफवाही पसरली होती.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. अनेक मराठी, हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. अनेक आव्हानात्मक भूमिका त्यांनी साकारल्या.

अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' सिनेमाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 'अनुमती' या 2013 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली.

विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.