Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २६, २०२२

कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार | 13th Agrovision 2022, India's Premier Agri Summit

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार- 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

१३ व्या ऍग्रो व्हिजन - राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ




नागपूर 25 नोव्हेंबर 2022

देशाचे पहिले कृषीमंत्री स्वर्गीय डॉ. पंजाबरावदेशमुख यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील दाभा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाच अ‍ॅग्रीकल्चर कन्वेशन सेंटर- कृषीसंमेलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे . यासाठी 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे . यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याच आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिल आहे , अशी माहिती , केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातीलनवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी त्याचाउपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी याहेतून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १३ व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- पीडीकेव्हीच्या दाभा मैदानावर झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रामुख्यान उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी वर्धा रोडवर 4,400 चौरस फूट जागेवर अ‍ॅग्रो व्हिजनचे कार्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. यासोबतच शेजारी असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागेवर सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र मॉल वजा बाजार स्थापन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी अ‍ॅग्रो व्हिजन हे शेतक-यांचे राहणीमान बदलण्याचे तंत्र आहे असे सांगितले . मध्यप्रदेश शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ केली, खर्चात कपात केली,शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून दिला, आधुनिक शेतीवर भर दिला आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे यावर्षी १८ टक्के कृषी विकास दर गाठणे सरकारला शक्य झाले. असेही शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले.

25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित चार दिवसीय ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात ऊस शेती , विदर्भातमत्स्य व्यवसायाचा विकास ,बांबू उत्पादनातून संधी , विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्यपरिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. या प्रसंगी आयोजित कृषीप्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालन , कृषी अवजार, पतपुरवठा संस्था,बँक , कृषी संशोधन संस्था यांची दालन आहेत. यंदाच्या अॅग्रोव्हिजनची संकल्पना 'अन्न, चारा आणि इंधन ' - भविष्यातील शेती ' अशी आहे.या कृषी प्रदर्शनात सुमारे 450 दालन असून बायो सीएनजी वर चालणाराट्रॅक्टर देखील येथे आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने , वर्ध्याचे खासदार रामदास तडस, अ‍ॅग्रोव्हिजनचे सल्लागार डॉ. चारूदत्त मायी , महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गडाख, इंडियन ऑईलचे शंतनू गुप्ता, बँक बँक ऑफ इंडियाचे शंतनू पेंडसे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर,आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शेतकरी , कृषी विभागाचे अधिकारी , नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत .

Ranking second in the world in farm output, the agricultural sector is the backbone of Indian Economy contributing majorly to the country's GDP (Gross Domestic Product). As on February 2018, it is estimated that over 58% of rural Indians depend on agriculture for their livelihood and this sector contributes around 17-18% to the country's GDP. The Indian food industry is also poised for huge growth which employs more than 50% of the workforce in India. The contribution is going to increase in world food trade every year due to its immense potential for value addition, particularly within the food processing industry. The industry and agriculture have linkages which need to be reinforced for having an integrated economy with special farmer-industry partnership. Thus it is required to educate and equip farmers with latest technologies and farm practices.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.