Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १३, २०२३

भाजयुमोकडुन द केरला स्टोरीचे स्पेशल स्कीनिंग! The Kerala Story



राष्ट्र सेविका समिती, अभाविप, भाजयुमोच्या १००हून जास्त युवतींनी बघितला चित्रपट

भाजयुमो, नागपूरच्या नेतृत्वात सर्व महिलावर्गासाठी नागपुर येथील वि.आर. मॅालमधील सिनेपोलीस या मल्टीप्लेक्समध्ये द केरला स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बघण्याचे आयोजन करण्यात आले होते. अभाविप विद्यार्थिनी कार्यकर्ता, भाजयुमोच्या युवती आणि राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका यांनी काल मोठ्या संख्येत उपस्थित राहून हा चित्रपट बघितला. भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्यासह १००हून जास्त भगिनींनी हा चित्रपट बघितला.

प्रत्येक हिंदू मुलीने बघावा असा हा चित्रपट आहे. असे नव्हे तर, देशातील प्रत्येक मुलीने बघावा असा हा चित्रपट आहे. चित्रपट संपल्यावर प्रत्येकीच्या डोळ्यात संताप दिसत होता. अंगावर शहारे आणणारा, आपल्या धर्माबद्दल सखोल विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. (The Kerala Story)

या चित्रपटाला अहिल्या मंदिर छात्रावास, खापरी इथून देखील मुली हा चित्रपट बघण्यासाठी आल्या होत्या. आपला धर्म, आपला देश पोखरण्याचं हे षडयंत्र जाणून घेण्यासाठी प्रत्येक मुलीनेच नाही तर प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट बघितलाच पाहिजे.

या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी मदत केली.

भाजयुमो कडून डिंपी बजाज, राष्ट्र सेविका समिती कडून स्मिता पत्तरकिने तर अभाविप कडून नुपुर देशपांडे ह्यांनी हा शो युवतींपर्यंत पोहोचवण्यास मेहनत घेतली. लिना गघाणे, मृणाल पानसे आणि बऱ्याच मोठ्या संख्येत इतर युवती उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.