Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे १४, २०२३

३३ महाविद्यालये अपात्र; विद्यापीठाची मोठी कारवाई





औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) संलग्नित ३३ महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य नसणं, तसंच पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या अध्यापक महाविद्यालय, शारिरीक शिक्षण महाविद्यालय आणि विधी शाखेच्या महाविद्यालयाचा यामधे समावेश आहे. (33 colleges disqualified; A big action by the university)

गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही या त्रुटींची पूर्तता करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय कुलगुरुंनी घेतला. अपात्र करण्यात आलेल्या महाविद्यालयांमधे बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक १४ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ११, धाराशिव सात, तर जालना जिल्ह्यातल्या एका महाविद्यालयाचा समावेश आहे.

दरम्यान, पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्यावर देखील निर्णय घेण्यात येणार असल्याचं, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.