Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे १४, २०२३

हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन; आमदाराने दिला इशारा

जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा आमदार अतुल बेनके यांचा इशारा


जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अतुल बेनके यांनी पाण्यासाठी मोठे तिव्र आंदोलन करून धरणातून एक थेंबही पाणी सोडू दिले जाणार नाही असा इशारा दिला.


कुकडी प्रकल्पातून उन्हाळी हंगाम अवर्तन क्र.२ साठी माणिकडोह धरणातून ०.४०० दलघफु पाणी सोडण्याचा निर्णय झाला असताना ०.८८८ दलघफु पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात ते बोलत होते. आमदार अतुल बेनके, भाजपा नेत्या आशाताई बुचके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे विग्नहर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, मनसेचे मकरंद पाटे, संतोष खैरे , दिलीप गांजाळे, माजी पंचायत समिती सभापती बाजीराव ढोले , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसो देवाडे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .



आ. अतुल बेनके यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कालवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली ९ मे २०२३ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून उन्हाळी हंगाम अवर्तन क्र.२ साठी ३.६३३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीत माणिकडोह धरणातून ०.४०० दलघफु पाणी सोडण्याचा निर्णय झाला असताना सल्लागार समितीचे सदस्य-सचिव सं. मा. सांगळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अंधारात ठेवून प्रत्यक्षात ०.८८८ दलघफु पाणी सोडण्याचा परस्पर निर्णय घेऊन इतिवृत्त मध्ये पालकमंत्री यांची सही घेऊन त्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप केला.
भाजप नेत्या आशाताई बुचके, आदिवासी नेते देवराम लांडे , ऍड संजय काळे, माऊली खंडागळे, संतोष खैरे तसेच मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.