पाणीपुरवठा योजना मंजुरीचे पत्र श्री संत लटारे महाराजांच्या चरणी अर्पण
कारंजा (घाडगे)
- कारंजा शहराची 34 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना अखेर सुमित वानखेडे व आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे कारंजा दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टी तर्फे पाणीपुरवठा योजना मंजूर करून द्यावी याकरिता निवेदन दिले होते. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वाढीव पाणीपुरवठा योजना ही अत्यंत महत्त्वाची असून ही योजना सुमितदादांनी मंजूर करून द्यावी याकरिता भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यांनी एकमुखाने मागणी केली होती.
श्री संत लटारे महाराजांच्या (Shri Sant Latare Maharaj) पुण्यतिथी सप्ताह दरम्यान आपण ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू असे ठोस आश्वासन सुमितदादा यांनी दिले होते.त्याप्रमाणे
दिनाक ११ गुरुवार ला येथील ग्रामदैवत श्री संत लटारे महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी मंदिरात येऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पत्र श्री संत लटारे महाराजांच्या चरणी भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंदजी बारंगे यांच्या हस्ते अर्पण केले. पुण्यतिथी सप्ताह निमित्त भागवत कथेचे व्यासपीठावर श्री संत लटारे महाराज मंदिर कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ प्रांजळे, यांच्या हस्ते सुमित वानखेडे यांचा मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी अंकुशजी दर्यापूरकर, प्रल्हाद मोटवानी, बकुल जसानी, राम वसुले, जनार्दन चाफले, संजय कदम, बाबाराव घाडगे, मुन्ना जयस्वाल, यांच्यातर्फे सुमित दादांचा शाल, श्रीफळ व हार देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहराची पाणीपुरवठा योजना कशा प्रकारे महत्त्वाची होती व लवकरच पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लागून कारंजा वासियांची पाण्याची समस्या कायमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री संत लटारे महाराजांच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा योजना मंजुर करण्याचा दिलेला शब्द पुर्ण करु शकलो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.. योजनेचे काम यशस्वीपणे करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय व कारंजा शहरातील समस्त जनतेची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.. पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याबद्दल समस्त कारंजावासी यांचे अभिनंदनही केले, सत्काराबद्दल श्री संत लटारे महाराज मंदिर कमिटीचे आभार व्यक्त केले. श्री संत लटारे महाराजांच्या व्यासपीठावर जो मान सन्मान मिळाला तो मी कधीही विसरू शकणार नाही, असे पुढे बोलतांना ते म्हणाले,
गेल्या कित्येक वर्षापासून कारंजा शहरांमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. सात ते आठ दिवसात एक तास नळाद्वारे नगरपंचायततर्फे पाणीपुरवठा केला जातो.येथे पाणी टंचाई च्या झळा सहन करत करत अनेक पिढ्या गारद झाल्या, पाण्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नसल्याने यामध्ये वापर करणे शक्य नाही मागील पाच वर्षांमध्ये व सध्या कारंजा नगरपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी - शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्र मध्ये येताच येथील नागरिकांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. विकासाची कामे मार्गी लागणार असा आत्मविश्वास सर्वांना होता.
वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने कारंजा शहरांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.येत्या काही दिवसांमध्ये हे काम चालू होऊन शहरातील जनतेचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होणार आहे.त्यामुळे कारंजा शहराच्या विकासामध्ये अधिक वाढ करणारी ही योजना आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने निवेदनाद्वरे केलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपा पदाधिकारी, नगरसेवक ,नगरसेविका ,कार्यकर्ते यांनी सुमित वानखेडे व आमदार दादाराव केचे यांचे आभार मानले, व कारंजा शहरातील समस्त जनतेनी अभिनंदन केले.
कारंजा शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुर केल्यामुळे सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्व पक्षीय नेते तसेच नगरसेवक व कार्यकर्ते सूमित वानखेडे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहे..
वाढीव पाणीपुरवठा मंजुरीकरिता येथील नागरिकांना अनेकदा वेगवेगळे आंदोलन, मोर्चे , उपोषण करावे लागले येथील कारंजा नागरी संघर्ष समिती व स्थानिक नगरपंचायत चे पदाधिकारी व अधिकारी यांनीही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता, त्यामुळेच ही उपलब्धी नागरिकांना मिळाली