Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १२, २०२३

दहावी- बारावीचा निकाल जाहीर; निकाल कसा पाहाल? | HSC CBSE result #CbseResult2023


बारावीचा निकाल जाहीर; निकाल कसा पाहाल? HSC CBSE result

CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने 10वी आणि त्यानंतर 12वीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसई (CBSE 12th Result 2023 : ) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहे. #CbseResult2023

(Maharashtra News) गेल्या वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल. निकाल कसा तपासायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.  #CbseResult2023

CBSE 12th Result 2023 : निकाल कसा पाहाल?

स्पेट 1 : CBSE ची अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 : मेन पेजवर, 'CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक' वर क्लिक करा.
स्टेप 3 : लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी.
स्टेप 4 : तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.
स्टेप 5 : विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.

दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये:

  • सीबीएसई दहावीचा निकाल ९३.१२ टक्के
  • मागील वर्षीच्या तुलनेत निकालात १.२८ टक्क्यांची घसरण
  • मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण मुलींची टक्केवारी जास्त
  • ४४,२९७ मुलांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण
  • गुणवत्ता यादी वा टॉपर विद्यार्थ्यांची माहिती जाहीर न करण्याचा बोर्डाचा निर्णय



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.