*भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे प्रतिपादन*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे.सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होतो आहे ते आपण बघत अहात.भारत आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे.देशात आरोग्यसाठी आवश्यक अनेक आजारावरील लस आणण्यास 100 वर्षे लागलीत,पण कोरोना सारख्या महामारीवर 9 महिन्यात लस तयार करून जनतेला देण्यात आली.सर्व जग पुन्हा कोरोनाने हादरले असतांना आपण सारे मास्क न लावता येथे गोळा झाले आहेत.हा मोदींच्या दूरदृष्टीचा व निर्णय क्षमतेचा परिणाम आहे.हेच नाहीतर जनतेसाठी अनेक योजना भाजपाने आणल्या.यात त्यामुळे सर्वस्तरावरील जनतेला लाभ मिळतो आहे.देशाचा सर्वांगिण विकास करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. नक्राशु ढाळणारे कोण आणि आपल्या भल्याचा विचार करणारे कोण हे ओळखण्याची हीच वेळ आहे.जनतेने याचा विचार करून भाजपाच्या पाठीशी उभे रहावे.रिपोर्ट कार्ड घेऊन जाणे ही भाजपाची संस्कृती आहे.असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केले.ते चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या विजय संकल्प जाहिरसभेत सोमवार 2 जानेवारीला बोलत होते.भाजपाला विजयी करण्याची जबाबदारी आता तुमची आहे अशी भावनिक साद त्यांनी घातली.
यावेळी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, चंद्रपूरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, खासदार रामदास तडस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नड्डा पुढे म्हणाले,आता महाराष्ट्राची चौफेर प्रगती करणारे सरकार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आले आहे.मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिनाने 3 लाख 75 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. "व्हायब्रंट गुजरात' प्रमाणे "मॅग्नेटिक महाराष्ट्र' योजना आणली आहे. भाजपाने देश, प्रदेश आणि गावपातळीवर विकासाची कथा कमळ चिन्हावर लिहिली. हा विजयी रथ चंद्रपूरच्या जनतेला समोर घेऊन जायचा आहे.
वीरता, शौर्यासाठी ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी डावलून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करीत पाठीत खंजीर खूपसला. अनैसर्गिक आघाडी जास्त दिवस टिकत नाही. झालेही तसेच. विचारधारेला तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी हिंदु सणांवर बंदी घातली. महाविकास आघाडीचा जाॅइंटली एक्वायरिंग मनी असा धंदा सुरू होता. डिलरशिप, ब्रोकेज व ट्रान्सफर हेच ते करीत होते. तर आमचे 'डीबीटी' म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर असे आहे, अशी टीका जगत प्रकाश नड्डा यांनी केली.कार्यक्रमाचे संचालन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी आभार मानले.जाहीरसभेनंतर जेपी नड्डा यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले.
*विदर्भातील सर्व जागा जिंकू-बावनकुळे*
विजय संकल्प जाहिरसभेचे प्रास्ताविक करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले विदर्भातून 11 खासदार भाजपाचे निवडून यावे यासाठी लोकसभा प्रवास दौरा सुरू आहे.संघटनात्मक दृष्टिकोनातून उत्तम नियोजन झाले आहे. विदर्भासह आणि महाराष्ट्र जेपी नड्डा यांची स्वप्नपूर्ती करील असे ते म्हणाले.विदर्भातील सर्व जागा जिंकू.2019 मध्ये चंद्रपूर लोकसभेची जागा निवडून येऊ शकली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.
*चंद्रपूर लोकसभा जिंकून रिटर्न गिफ्ट देऊ*
चंद्रपूरचा इतिहास गौरवशाली आहे.इंग्रजांचा युनियन जॅक सर्वप्रथम येथेच खेचण्यात आला.सैन्यासाठी सर्वाधिक सोने येथील जनतेने त्याग भावनेतून दिले.जगात सर्वधिक वाघ येथेच आहे.सर्वाधिक उष्णता असल्याने येथे शुद्धता आहे.हा प्रदेश उर्जावान आहे.माता महाकाली नगरीत भाजपाची विजय संकल्प जाहीर सभा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा घेत आहेत.येणाऱ्या दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेसह सर्व निवडणूका भाजपाच जिंकेल अशी रिटर्न गिफ्ट देऊ अशी हमी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.