संपात ८६ हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते सहभागी
विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्यांच्या नावाने ओरडू नका
नागपूर: -
विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्व विद्युत ग्राहकांना एक विनंती केली आहे,त्यांनी आपल्या विनंतीत असे म्हटले आहे कि ग्राहकांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत . कारण 4,5,6 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहनार आहेत. या दिवशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. mahavitaran, Maharahstra, MSEB, mahanirmiti, mahavitaran,
खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीय. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारलाय. तीन दिवसीय संपामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज कर्मचारी संघटननी सोशल मीडियावर १ पोस्ट फिरविली आहे त्यात त्यांनी काय म्हटले वाचूया सविस्तर..
हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल (BSNL) कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुल्यामुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भांडूप झोन मधील नवी मुंबई, उरण, ठाणे, मुलुंड तळोजा क्षेत्रातील ३ लाख वीज ग्राहकांचे क्षेत्र अदाणी कंपनीने समांतर वीज वितरण करण्याकरीता Maharashtra Electricity Regulatory Commission कडे अर्ज सादर केलेला आहे. या शासनाच्या धोरणाचा वीज उद्योगातील ३० संघटनांच्या संघर्ष समितीने व्दारसभा घेऊन नागपूर विधानसभेववर २३ डिसेंबर रोजी ३५ हजार कामगारांचा मोर्चा काढून व संपाची नोटीस देऊन तित्र विरोध केला. परंतू शासनाच्या अडेल तट्टू धोरणामुळे वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना नाईलाजास्तव संप करावा लागत आहे.या संपामधे वीज उद्योगातील तिन्ही कंपनीतील ८६ हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते सहभागी होणार आहे.वीज उद्योगातील महत्वाचा घटक हा कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार आहे. कंत्राटी-आऊटसोर्सिग कामगारांना कायम करा या मागणी करीता विविध संघटनेमार्फत वर्षाबूवर्षे आंदोलन झालेले आहे. म्हणजे वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना संघटनांनी वाऱ्यावर सोडलेले नसून नेहमी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहतात. या आंदोलनामध्ये सुध्दा कंत्राटी-आऊटसोर्सिग सुरक्षा रक्षक यांना कायम करा ही मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे सरचिटणीस कृष्ण भोईर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की , "राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमधील खाजगीकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चालक, वायरमन, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांच्या 30 हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत."तिन्ही वीज कंपन्यांचे सुमारे 86,000 कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते,42,000 कंत्राटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक बुधवारपासून खाजगीकरणाच्या निषेधार्थ 72 तासांच्या संपावर जाणार आहेत,"या आंदोलनात कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत, परंतु राज्यातील जनतेच्या मालकीच्या या वीज कंपन्या टिकाव्यात अशी आमची इच्छा आहे. केवळ नफा कमावण्याचा हेतू असलेल्या खाजगी भांडवलदारांना या कंपन्या विकल्या जाऊ नयेत," असे भोईर म्हणाले.आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा कृती समितीने दिला आहे.