Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०५, २०२२

"ते पन्नास दिवस" : पंधराशे किलोमीटरचा पायदळ प्रवास

पवन भगत यांच्या या कादंबरी ला ऑथर ऑफ दि ईयर


मुंबई ते बनारस या १५०० किलोमीटरच्या पायी प्रवासात मानवी अंतरंगात घडणार्‍या एका वेगळ्या महाप्रवासाचे दर्शन लेखक घडवतो. मुंबई या आर्थिक राजधानी कडून बनारस या एका पारंपरिक शहराकडे हे सगळे चालले आहेत. जणू आधुनिकतेकडून पुरातन काळाकडे ते चालले असावेत. दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण असलेल्या या पात्रांचा भौतिक प्रवास असा घडत असला तरी त्यांचा मानसिक प्रवास मात्र एका वेगळ्याच अदभूत दिशेला होतो. ती दिशा कोणती? शेवटी ते त्यांच्या गावी पोहोचू शकतात का? दरम्यान त्यांच्यात कोणते आंतरबाह्य बदल होतात, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचावी. वेगळे काहीतरी गवसेल.   

बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रोख आणि सन्मान पत्र या पुरस्काराचे स्वरूप असून. महामारी च्या काळात अचानक पणे लादण्यात आलेल्या टाळेबंदी च्या निर्णयाने स्थानांतरित मजुरांची ससेहोलपट भूक उपसमारीचा सामना करीत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास या कादंबरीत विशद करण्यात आला आहे.

 Those Fifty Days : A fifteen hundred kilometer march on foot


कोरोना काळातील माणूस पण हरवलेल्या समाजाचे चित्र महामारी ला अवसर म्हणून केलेल्या काळाबाजारी, भेदभाव, सावकारी, कर्जबाजारी, रस्त्यावरील मजुरांचा मृत्यू, रेल्वे रुळावरील स्थानांतरित मजुरांची प्रेते,पायदळी चालणाऱ्या मजुरांचे शोषण,पोलिसी अत्याचार, बहिष्कृत जगणे ,रस्त्यावरील होत असलेल्या प्रसूती, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, कोरोना चे सांप्रदायिकरण,निसर्ग निर्मित महामारी च्या दहशतीचे अमानवीय स्वरूप, रस्त्यावरील चालणाऱ्या मजुरांचे भुके समोर जात,धर्म,पंथाच्या उभ्या असलेल्या इमारती कोसळल्या,केवळ मजूर म्हणून जंगलातील पाने फुले खाऊन एकमेकांना सांभाळत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास ..या कादंबरीत मांडण्यात आला असल्याने साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे..



अमेझॉन वर या कादंबरी ला चांगली मागणी असल्याने,या वर्षीच्या ऑथर ऑफ दि यिअर या पुरस्काराने कलकत्ता येथे देश विदेशातील साहित्यिक, पब्लिशर च्या पुढे हा पुरस्कार देण्यात येत आहे..
लेखक पवन भगत यांचे सिद्धार्थ वाघमारे,अशोक निमगडे सर, सुरेश नारनवरे जितेंद्र डोहणे तसेच अनेक साहित्य संस्थेने अभिनंदन केले..


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.