Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १६, २०२२

Nagpur Metro | स्वतंत्रता दिना दिवशी तब्ब्ल ९०७५८ नागपूरकरांनी मेट्रोने केला प्रवास | Ridership Nears One Lakh Mark

Nagpur News
नागपूर (Nagpur Metro) : नागपूर मेट्रो अंतर्गत असलेल्या प्रवासी संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीने आज शिखर गाठले आणि काल (१५ ऑगस्ट) मेट्रोची प्रवासी संख्या ९०७५८ इतकी विक्रमी रायडरशिप गाठत मागील सर्व विक्रम मोडण्यात आले. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रो तर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे.या पूर्वी २६ जून २०२२ रोजी विक्रमी ६६२४८ प्रवाशांनी मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला होता. अशा प्रकारे काल (१५ ऑगस्ट) रायडरशिप २६ जून २०२२ च्या तुलनेत २४,३३० जास्त होती - हा आणखी एक नवा विक्रम आहे.



उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी संख्येत सतत वाढ होत असून प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२१) रोजी महा मेट्रोने ५६४०६ प्रवाश्यानी मेट्रोने प्रवास केला होता. तथापि २६ जानेवारी २०२१ ची रायडरशिप नियमित आठवड्याच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येशी जुळते ! ही स्थिर आणि निश्चित वाढ नागपूरकरांच्या अतोनात सहकार्यामुळे आणि आपुलकीमुळे शक्य झाली आहे आणि त्यासाठी महा मेट्रो आपले मनापासून आभार मानते.

महा मेट्रोने 1 लाखा पर्यंत गाठलेला हा आकडा उर्वरित २ मार्ग (कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) आणि (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) कार्यान्वित झाल्यानंतर ते 1.5 लाखाचा टप्पा सहज पार करेल. महा मेट्रोने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून ज्यामध्ये फीडर सेवा, महा कार्ड आणि मोबाइल ऍप, ट्रेनच्या वेळेत वाढ करणे इत्यादीसारख्या अनेक पाऊले महा मेट्रोने उचलल्यामुळे ही विक्रमी रायडरशिप गाठता आली आहे.

आता पर्यंतच्या सर्वाधिक रायडर्सशिपचा ट्रेंड सकाळ पासूनच जाणवू लागला आणि दिवसभर यामध्ये बदल होत गेले. सकाळ पासूनच मेट्रो स्थानकांवर मेट्रो प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली,जसजसा दिवस मावळत गेला तसतसा मेट्रो प्रवाश्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली, दिवसभर पाऊस पडत असला तरी, नागरिकांची उत्सुकता कमी होऊ शकली नाही.

सर्व मेट्रो स्थानके प्रवाश्यांनि खचाखच भरली होती विक्रमी रायडरशिपच्या अपेक्षे प्रमाणे महा मेट्रोने सर्व मेट्रो स्थानकांवर आवश्यक व्यवस्था केल्या होत्या. किंबहुना, गेल्या काही काळापासूनचा ट्रेंड बघता, महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि या बाबींचा विचार करून आणि प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन, वाढलेल्या प्रवाशांना हाताळण्यासाठी महा मेट्रोने सर्व स्तरांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते.

मुख्य म्हणजे, सर्व मेट्रो स्थानकांवर, विशेषत: सिताबर्डी इंटरचेंज मोठ्या प्रमाणात लांब रांग बघायला मिळाली, जिथे प्रवाशांनी सकाळपासूनच मेट्रो राइडसाठी तिकीट खरेदीसाठी रांग लावली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरकरांनी मेट्रो स्थानकांवर गर्दी केल्याने प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. "गृहिणी श्रीमती आशा पाटील म्हणाल्या, ''मी याआधी असा मेळावा कधीच पाहिला नाही. हे खूप उत्साहवर्धक आहे आणि महा मेट्रोच्या प्रवासी संख्या आणखी वाढण्यास खूप मदत होईल.''

उद्योजक श्री विजय चव्हाण यांनी सांगितले कि,''महा मेट्रो मेट्रो स्थानकांवर खरेदी आणि मनोरंजनाच्या उपक्रमांसारख्या अनेक सुविधा करून देते जे कि, मेट्रो राईडची मोहकता आणखी वाढवते.'' महा मेट्रोच्या प्रवासी संख्येच्या प्रयत्नांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद याला पूरक ठरले. स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी महा मेट्रोने विविध मेट्रो स्थानकांवर चित्रकला स्पर्धा, संगीत कार्यक्रम, सीआरपीएफ बँड, फ्लॅश मॉब यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Metro News

सिताबर्डी इंटरचेंज येथे 'महा मेट्रो आणि केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आझादी का अमृत महोत्सव वरील प्रदर्शन हे प्रवाशांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. ही ऐतिहासिक आणि विक्रमी रायडरशिप निश्चितपणे मेट्रो ट्रेनमधील प्रवासीसंख्या आणखी वाढविण्यात मदत करेल.  



· *Nagpur Metro Ridership Nears One Lakh Mark*

· *Record 90,758 Nagpurians Rode Metro on I Day



NAGPUR: Maha Metro Nagpur broke all previous records to establish an all-time highest ridership of 90,758 on Independence Day (15th August 2022). The all-time high ridership before this was on 26 June 2022 when a record 66,428 commuters had rode the metro train. Thus yesterday's ridership was 24,330 more than that on 26 June 2022 - another record in itself!



In fact Maha Metro Nagpur ridership has been steadily increasing with the passage of time. Maha Metro recorded a peak of 56406 on 26th January 2021 - Republic Day. However the ridership on 26th January 2021 matches the number of commuters who travel by on regular weekdays! This steady and certain growth has been possible because of the extreme co-operation and affection extended by the Nagpurians and Maha Metro extends its heartfelt gratitude for the same.



Maha Metro has neared 1 lakh mark and could easily cross 1.5 lakh mark, once the remaining two lines (Kasturchand Park-Automotive Square Metro Station) & (Sitabuldi Interchange-Prajapati Nagar Metro Station) get operational. This record ridership could be achieved because of the multiple steps taken by Maha Metro like providing commuter friendly facilities at Metro Stations, Providing Feeder Service, Maha Card & Mobile App, Increasing Train Timings etc.



The trend of highest ever ridership was felt right in the morning and continued throughout the day. The rush was evident right since morning and picked up as the day passed on. Though it rained almost all through the day, it could not dampen the interest of the citizens, as they ventured out of the house for a metro ride.


All the metro stations were crowded with passengers and Maha Metro had made all the necessary arrangements in anticipation of the record Ridership. In fact, given the trend for some time now, Maha Metro ridership has been continuously on the rise and considering these factors and anticipating this commuter rush, Maha Metro deployed additional staff at all levels to handle the increased commuters.



In fact, long and serpentine queues were witnessed at all the Metro Stations, especially Sitabuldi Interchange where commuters had lined up to buy tickets for Metro Ride since morning. The concourse, platform witnessed great rush as Nagpurians rushed to Metro Stations for a ride on Independence Day. Said homemaker Smt Asha Patil, ``I have never witnessed such a gathering before. This is very encouraging and would go a long way in boosting Maha Metro ridership further.''


Added businessman Shri Vijay Chavan, ``The fact that Maha Metro offers a range of facilities like shopping and entertainment activities at Metro Stations adds to the charm of Metro ride.'' The tremendous response to the Maha Metro's efforts for ridership was supplemented with the carnival organized to celebrate this Day. As part of these efforts events like drawing competitions, music programmes, CRPF Band, flash mob were organized at different Maha Metro Stations.





An exhibition on Azadi Ka Amrut Mahotsav (AKAM) jointly organised by Maha Metro and Central Bureau of Communication, Ministry of Information and Broadcasting, Government of India was another attraction for the commuters. Guards, Station Staff and other essential staff adequately deployed at all the Metro Stations. This historic and record-breaking ridership would definitely go a long way in boosting ridership in Metro trains.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.