Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १९, २०२१

सेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावरील मेट्रो कामाला गती; स्टेशन, रूळ टाकण्याचे काम प्रगती पथावर




नागपूर, १९ : कोरोना मुळे एकूणच सर्वत्र विपरीत परिणाम झाला असताना, महा मेट्रो द्वारे व्हायडव्क्ट,स्टेशन, आनंद टॉकीज येथील कॅटीलीव्हर पूल, गड्डीगोदाम गुरुद्वारा जवळ डबल डेकर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य देखील जलद गतीने सुरु आहे. महा मेट्रोने नुकतेच रिच २ मार्गिकेवरील (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक) मेट्रो स्टेशन दरम्यानच्या झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेनचे यशस्वी रित्या ट्रायल रण पूर्ण केले होते. डिसेंबर २०२१ पर्यंत रिच २ आणि रिच ४ मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून निर्माण कार्य पूर्णत्वाच्या दिशेने अग्रणीय आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सर्व स्टेशन आता प्रवासी सेवा मध्ये उपलब्ध आहे.


· *रिच – ४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) :*

रिच – ४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, या मार्गिकेवर रूळ बसविण्याचे कार्य सुरु आहे तसेच या मेट्रो मार्गिकेवरील ९१% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशन ८०%, दोसर वैश्य चौक ९४%, अग्रसेन चौक ९५%, चितार ओळी ८५%, टेलीफोन एक्सचेंज चौक ९५%, आंबेडकर चौक ९१%, वैष्णोदेवी चौक ९३%, प्रजापती नगर ५८% स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.

मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रक वरून राहणार आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.


· *रिच-२(सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक):*

रिच-२ (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक) कॉरीडोरचे गतीने सुरु असून आता पर्यत ८५% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये झिरो माईल ९९%,कस्तुरचंद पार्क ९५%,गड्डीगोदाम चौक ६०%,कडबी चौक ५५%,इंदोरा चौक ५०%,नारी रोड ७०% आणि आटोमोटीव्ह चौक ८०% मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गिकेवरील सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत ट्रॅक टाकण्याचे कार्य पूर्ण झाले आहे व इंदोरा चौक ते नारी रोड दरम्यान देखील ट्रॅकचे टाकण्याचे कार्य सुरु आहेत.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – २ अंतर्गत ४ स्तरीय संरचना असलेली परिवहन व्यवस्था आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसर्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील.कामठी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहनांची ये-जा येथून अविरत सुरुच असते. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कॉलेज, व्यापारी संकुले,बँक,शासकीय कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत. तसेच हा रस्ता उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख रस्ता आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.