Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १९, २०२१

केजरीवालांच्या विराेधात विकृत लिखाण करणाऱ्यांनी मागितली पाेलिसांसमाेर माफी



प्रविण उपगन्लावार आणि आनंद खांडरेची पाेलिसांसमाेर माफी


चंद्रपूर ता. 19- दिल्लीचे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल , खासदार संजय सिंह आणि  अन्य नेत्यांविराेधात समाजमाध्यमांवर सातत्याने विकृत लिखाण करणाऱ्या चंद्रपुरातील प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांची आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांगलीच जिरविली. पाेलिसात तक्रार करताच या दाेघांचेही धाबे दणाणले.  थेट रामनगर पाेलिस ठाणे गाठून उपगन्लावार आणि खांडरे यांनी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणी राज्य सभा सांसद संजय सिंह यांच्या नावे माफीनामा लिहून दिला. आमचे कॅरीयर चा प्रश्न आहे यापुढे अशी चुक हाेणार नाही असे म्हणत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची माफीही मागितली. 

प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे मागील अनेक दिवसांपासून काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांविराेधात समाज माध्यमांवर विकृत लिखाण करीत आहे. या दाेघांनाही अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आपले कुणीच वाकडे करु शकत नाही, या अविर्भावात त्यांच्या भाषेचा दर्जा घसरत गेला. विकृत आणि विद्वेष वाढत गेला. १६ जून राेजी प्रवीण उपगन्लावार यांना आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबियांविषयी फेसबुकवर अतिशय खालच्या तसेच घाणेरड्या भाषेत गरळ आेकली. त्यावर नेहमीप्रमाणे आनंद खांडरे यांनीही उपगन्लावार यांच्याही शब्दाला लाजवेल, अशा प्रतिक्रीया टाकल्या. 


 नेहमीप्रमाणे आपले काहीच हाेणार नाही, असा समज करुन या दाेघांनीही समाज माध्यमांवर आपल्या विकृतीचे प्रदर्शन सुरुच ठेवले. दरम्यान याची माहिती आज आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाली. आपचे जिल्हा अध्यक्ष  सुनील देवराव मुसळे,  माजि जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, कोषाध्यक्ष भिवराज सोनी अँड.प्रतिक विराणी यांनी थेट रामनगर  पाेलिस ठाणे गाठले आणि या दाेघांचीही रितसर तक्रार केली.  या दाेघांनाही पाेलिसांनी ठाण्यात आणले. त्यानंतर मात्र उपगन्लावार आणि खांडरेचे धाबे दणाणले. गयावया केली. आपच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली. एवढेच नाहीत तर दाेघांनीही स्वतंत्रपणे ठाणेदारांना  माफीनामा लिहून दिला. यापुढे अशी चूक कधिही करणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली.

यावेळी संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, बबन कृष्णपालिवार ,सूर्यकांत चांदेकर ,अॅड राजेश विरानी, राजेश चेडगुलवार , सिकंदर सागोरे तसेच आम आदमी पार्टी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित  होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.