Maharashtra News
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं. पण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'वंदे मातरम्' ला विरोध दर्शवला आहे. Sudhir Mungantiwar @AbdulSattar_99
सुधीर मुनगंटीवार यांच्या "या" निर्याणाचा रझा अकादमीने केला कडाडून विरोध
सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयामध्ये कामकाजादरम्यान हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे, असा निर्णय घेतला . पण त्यांच्या या निर्णयावरून विरोधकांनी टीका केली आहे. पण आता शिंदे सरकारचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच विरोध दर्शवला आहे. 'खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो जय महाराष्ट्र हा नारा असावा. शिवसेनेचा पहिला नारा हा जय महाराष्ट्र असतो. मी सुधीर मुनगंटीवार यांच्या विषयी काही बोलणे योग्य नाही. पण सगळ्यांनी जय महाराष्ट्रच बोलावे, असं स्पष्ट मत सत्तार यांनी व्यक्त केलं. सत्तार यांच्या या भूमिकेमुळे शिंदे सरकारमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याचे निर्देश, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
"सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता 'वंदे मातरम्' म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या निर्णयाचं स्वागत करतो. 'वंदे मातरम' म्हटलंच पाहिजे. बाळासाहेब ठाकरे देखील संभाषणाला सुरुवात करताना वंदे मातरम म्हणायचे."
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
'शासकीय कार्यालयात फोनवर 'वंदे मातरम' म्हणणं काही चुकीचं नाही.'
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
"भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फोन केल्यावरही हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलतात आणि ते ऐकायला छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो."
- भाजप नेत्या पंकजाताई मुंडे
सुधीर मुनगंटीवार यांच्या "या" निर्याणाचा रझा अकादमीने केला कडाडून विरोध
#SudhirMungantiwar #PoliticalNews #AbdulSattar