त्यागाचे स्मरण करून इतिहास घडविण्याची वेळ : आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन
Chandrpur News
चंद्रपूर : जेव्हापासून भाजपची सत्ता आली तेव्हापासून देशात अराजकता माजली आहे. देशाला पुन्हा नवीन दिवस आणण्यासाठी काँग्रेस च्या नेत्यांनी दिलेल्या त्यागाचे स्मरण करून इतिहास घडविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर Pratibha Balu Dhanorkar यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Azadi ka amrut mahotsav आयोजित कार्यक्रमात त्या बल्लारपूर येथील वस्ती विभागातून कॉलरी गेट, महात्मा गांधी पुतळा ते नवीन बस्थानक, तहसील कार्यालय ते नगरपरिषद कार्यालय इथपर्यंत पदयात्रा निघाली. त्यानंतर जाहीर सभेदरम्यान त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. काँग्रेसने या देशाला एका प्रगतीपथावर नेण्याचे काम केले.
काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून भाजप स्वतःला खाली खेचण्यासाठी आता सर्वांनी पुढे येण्याची आवाहन केले.
यावेळी आमदार विजय वड्डेटीवार, आमदार सुभाष धोटे, काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम, छाया मडावी, सुनंदा आत्राम, डॉ. बावणे, भास्कर माकोडे, शोभा महतो, ताजुद्दीन, पवन मेश्राम, राजू बहुरिया, दौलत बुडेल यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
Chandrpur News | MH34 | News 34 | Azadi ka amrut mahotsav