घुग्गुस शहरातील इंदिरा नगर येथील वेकोली वसाहतीची गॅलरी कोसळली ,सुदैवानं मोठी जिवीतहानी टळली
चंद्रपूर, chandrapur News,
घुग्गुस शहरातील इंदिरा नगर येथील वेकोली वसाहतीची गॅलरी मंगळवारी सकाळी अचानक कोसळली.यात मात्र सुदैवानं मोठी जिवीतहानी टळली असून वेकोलीचे अधिकारी ओमप्रकाश फुलारे आणि सिव्हिल अधिकारी सुनील कपूर यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
मागील 20 वर्षांपासून वेकोलीच्या इंदिरा नगर वसाहतीत वेकोलीचे कर्मचारी आपल्या परिवारासह राहत आहेत.ही वसाहत दुमजली असून पूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहे.तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. याबाबत येथील नागरिकांनी वेकोली क्षेत्राचे प्रबंधक व सिव्हिल अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन या वसाहतीचे काम करण्याची मागणी केली होती.मात्र याकडे वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
अशातच मंगळवारी सकाळी अचानक वसाहतीची गॅलरी कोसळली.खाली टिनाचे शेड असल्यानं गॅलरीचा मलबा शेड वर पडला.त्यामुळं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे.मात्र मोठे नुकसान देखील झाले आहे.याची माहिती वेकोली च्या अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा ते हजर न झाल्याने वसाहती मधील कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.त्यामुळं वेकोलोच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी व लवकरात लवकर या वसाहतीच्या डागडुजी चे काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.