चंद्रपूर/प्रतिनिधी:
चैत्र महिण्यात भरणा-या महाकाली मातेच्या जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात येतात. यात नांदेड सह इतर जिल्ह्यातील भाविकांची संख्या अधिक असते. मातेच्या दर्शनापुर्वी झरपट नदिपात्रात पवित्र स्नान करुन भाविक मातेचे दर्शन घेतात मात्र या भाविकांना उघड्यावरच स्नान करावे लागत होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी येथे लोकनेते किशोर जोरगेवार यांनी तात्पुरते स्नानगृह बांधून दिले आहे. जोरगेवारांच्या या उपक्रमाचे भाविकांनीही आभार मानले आहे.
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती संपूर्ण राज्यात व बाहेरील राज्यात सुद्धा पसरली आहे. चैत्र महिण्यात येथे भव्य जत्रा भरते या जत्रेला नांदेडची जत्रा असे संबोधले जात असले तरी या जत्रेत नांदेड जिल्ह्यासह परभणी, तेलंगाना येथील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल होतात. मात्र प्रशासणाच्या दुर्लक्षीत पणामूळे दरवर्षी या भाविकांना सोयी सुविधा अभावी मोठ्या हाल – अपेष्टा सहण कराव्या लागतात.
झरपट नदिच्या तिरावर स्नान केल्याशिवाय माता महाकालीचे दर्शन पवित्र होत नाही. अशी या भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे येथे भाविक सर्वप्रथम झरपट नदिच्या पात्रात पवित्र स्नान करतात यात महिलांची संख्या अधिक असते. मात्र प्रशासनाकडून येथे सोयी सुविधा पूरवील्या जात नसल्याने भक्तांना उघड्यावरच स्नान करावे लागते. खरे तर येथे येणारे भाविक हे चंद्रपूरातील अतिथी आहे. त्यामुळे त्यांची सेवा करुन त्यांना योग्य सोयी सुविधा पूरवण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.
भाविक महिलांच्या अब्रुचे रक्षण महापालीका करु शकत नसेल तर हे दुर्दैव आहे. ही बाब लक्षात घेता मागिल काही वर्षापासून यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या कडून यात्रेच्या पुर्वी या भागाची पहाणी केल्या जाते.
व यात्रेकरुंना शक्य ती मदत करण्याचे काम त्यांच्या कडून केल्या जात आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांच्या वतीने झरपट नदिच्या तिरावर महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उभारुन देण्यात आले आहे. त्यामूळे आता येथे स्नान करण्यासाठी येणा-या महिला भाविकांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. जोरगेवार यांच्या या उपक्रमाचे भाविकांकडूनही कौतूक केल्या जात आहे. येथे येणा-या भाविकांना पूर्ण सोयी सुविधा पूरविण्यात याव्यात अशी मागणी ही किशोर जोरगेवार यांनी केली आहे.