रामटेक/ प्रतिनिधी
परिसरातील अवैध रेती वाहतुक करणार्या टॅक्ट्रर चालकांन कडुन हप्ता मागणांर्या पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा रीडर हरिचंद बम्हनोटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी दोन वाजताचा सुमार तहसिल कार्यालय समोर लाच घेतांनी रंगेहात पकडले.
फिर्यादी सिताराम मधुकर निबोने वय ४९ रा. मनसर हा शेतकरी असुन शेती काम करीता टॅक्ट्रर आहे . पण कुणी गरीब लोकांना मागणी वर कधी कधी रेती आणायचा पण बम्हनोटे यांना रेती आणतो माहीत झाल्याने बम्हनोटे हे परीसरात सुरु असलेल्या सर्व टॅक्ट्रर चालकांन कडुन पैसे गोळा करुन मला देण्यात यावी. या करीता नेहमी एएसआय बम्हनोटे तकादा लावायचा व कोणतेही टॅक्ट्रर चालक पैसे देण्यास तयार होत नसल्याने फिर्यादी बम्हनोटे यांना सांगितले पण बम्हनोटे ऐकाला तयार नव्हते बम्हनोटे यांनी बत्तिस हजार पाचशे रुपयांची मागणी केली.
तडजोडीनंतर ही रक्कम 25000 ठरविण्यात आली. ठरल्याप्रमाणे आज दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी रामटेक तहसील कार्यालयासमोर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक नयन आलूरकर यांच्या शासकीय वाहनाचा चालक राजू अवजे या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकाऱी-कर्मचारी यांनी रंगेहात अटक करून ताब्यात घेतले.
या दोघांवरही महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्लवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, यांचे मार्गदर्शनात कारवाई पथक पथकातील पो.उप. अधिक्षक- शंकर शेळके,पो हवा प्रवीण पडोळे, ना पो शी प्रभाकर बले, नापोशी लक्ष्मण परतेती,पो.शी.सरोज बुधे, चालक- परसराम साई यांनी यशस्वीरित्या पार पाडली.