Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १५, २०१९

पालक प्रशिक्षण कार्यशाळा

      बदलत्या काळातील जबाबदार पालकत्व    




एक पालक म्हणून या बदलत्या काळात आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जबाबदाऱ्यांसोबतच अनेक प्रकारचे ताणतणाव आणि समस्यासुद्धा पालकांना भेडसावत आहे. ज्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम समाजावर आणि कुटुंबावर होताना दिसत आहेत आणि यावर प्रभावीरीत्या सकारात्मकरीत्या मात करण्यासाठी पारंपरिक पालकत्वाला बदलत्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भांना अनुसरून बालमानसशास्त्रातील संशोधनावर आधारीत जबाबदार पालकत्वाचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर होणे काळाची गरज आहे. म्हणूनच टेक्नोविजन पुरस्कृत ‘वजीर ऑनलाईन’तर्फे विदर्भात प्रथमच ‘बदलत्या काळातील जबाबदार पालकत्व’ या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. ज्यामध्ये आपल्याला तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे मिळेल जबाबदार पालकत्वाची तंत्रे आणि कौशल्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.

     कार्यशाळेची माहिती :

  • रविवार, दिनांक २१ एप्रिल २०१९
  • स्थळ : वासनिक सरज्‌ ॲकॅडमी, शासकीय ग्रंथालयाजवळ, कस्तुरबा मार्ग, चंद्रपूर
  • वेळ : सकाळी ११ ते ५
  • प्रवेश शुल्क : केवळ ५००/- रुपये (प्रति व्यक्ती)
  • टीप : प्रशिक्षणादरम्यान भोजन आणि चहाची व्यवस्था राहील.)
  • प्रवेश नोंदणी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच...
  • आपला प्रवेश आपण 9021858122 या व्हाट्सअप्प क्रमांकावरही नोंदवू शकता. आपले नाव, पत्ता, ईमेल, आणि भ्रमणध्वनी क्रमांक पाठवा
  • अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9423539264


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.