शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
:तालुक्यातील मागली येथील गुराखी गुरे चराईसाठी गेला असता वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला .
मधुकर कोटनाके वय ५५ वर्षे मांगली येथील रहिवासी असून वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे दिनांक ३ रोज मंगळवारला मधुकर आपले गावातील गुरे चराईसाठी अन्य गुराख्यान सोबत परिसरातील जंगलात गेला. सायंकाळ होताच अन्य गुराखी घरी आले मधुकर ची गुरे सुद्धा घरी आली परंतु मधुकर घरी आलाच नाही तो घरी न आल्याने घरील व्यक्ती चिंतेत पडली होते. घरील व्यक्तींनी गावातील काही मंडळींना घेऊन इतरत्र शोधाशोध करून कुठे पत्ताच लागला नाही. त्यानंतर बेपत्ता असल्या बाबत पोलीसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून गावकरी, वन कर्मचारी तसेच वन विकास महामंडळाचे कर्मचारी यांनी इतरत्र शोध घेत होते मात्र त्याच्या शोध लागला नाही. दोन दिवस लोटल्यानंतर मधुकर चा मृतदेह हा मांगली बीट कक्ष क्रमांक २१८ येथील निरगुडी तलाव, वनविकास महामंडळाच्या हद्दीत आढळला. दडी मारून बसलेल्या पट्टेदार वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केले. तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला घटनास्थळी वनरक्षक पी एम मत्ते, वनपाल बी आर इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत काळे पोहोचले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. असुन गुराख्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.