Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०५, २०२१

वीज पाणी आणि वेकोली मुळे निर्माण झालेल्या समस्या करिता गावकऱ्यांचे जन आंदोलन




वेकोली ची रेल्वे सायसडिंग पाडली बंद 



 
   शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
  माजरी :- वीज पाणी आणि वेकोली मुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या करिता  गावकऱ्यांनी आज जन आंदोलन करून वेकोली माजरी च्या सिएचपीच्या रेल्वे सायसडिंग पाडली बंद पाडली. या आंदोलनात महिला व लहानमुले ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आज सकाळी दहा वाजता पासून मोठ्या लोक प्रमाणात रेल्वे सायडिंग गोळासुरू झाले आणि रेल्वे वेगेन भरत असलेली पीसी मशीन बंद पाडली. या आंदोलनचे नेतृत्व करणारे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता ताहीरबानो मोहम्मद शेख यांनी वेकोली ने  लोकांचे वीज पुरवठा कापून माजरी च्या संपूर्ण जनतेला अंधारात राहण्यास भाग पाडले गेले. प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात गेले वेकोली च्या ब्लास्टिंग मुळे अनेक घरे पडने, अनेक घराला भेगा पडले, खाजगी ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनी असताना सत्तर टक्के स्थानिकांना रोजगार देणे हा कायदा असताना गावातील सुशिक्षित तरुणांना न घेणे, नाली सफाई नाही जागो जागी कचऱ्याचे माहेर घर बनून असून वेकोली प्रशासन जन समस्या कडे लक्ष न देता पाठ फिरविल्या मुळे माजरी ची जनता या समस्येवर जेंव्हा पर्यंत तोडगा काढत नाही तेंव्हा पर्यंत जन आंदोलन सुरू राहील अशी भूमिका ताहिरा बानो नी घेतली असून आज सायडिंग बंद पाडलीघेतली होती. दोन तासातच वेकोली अधिकारी आणि पोलीस प्रशासन आंदोलन स्थळावर पोहोचले व आंदोलन कर्ता च्या शिष्टमंडळ सोबत बैठकीस आमंत्रित केले वेकोली माजरी च्या सबएरिया ऑफिस मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य प्रवीन सूर,पंचायत समिती सदस्य माजी सरपंच बंडू बनकर, ग्रामपंचायत सदस्या ताहिरा बानो शेख, सीमा भारती, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास रत्नपारखी, कंकय्या पोतारम,  वेकोली चे उपमहाप्रबंधक आर बी वर्मा, कार्मिक प्रबंधक राजेश नायर, थोरात माजरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार विनीत घागे, भद्रावती तहसीलचे मंडळ अधिकारी गुणवंत वाभीटकर तलाठी माजरी विलास एम शंभरकर  सोबत चर्चा झाली आणि वेकोली ने अनेक मागण्या मान्य केले व वीज पुरवठा बाबत वेळ मांगीतले आणि आश्वासन दिले त्या नंतर आंदोलन ला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.