Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

इको-प्रो तर्फे पक्षी सप्ताहाचे ५ ते १२नोव्हेंबर पर्यंत आयोजन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:- पद्मभूषण डॉ सलीम अली तसेच सेवानिवृत्त वनाधिकारी श्री मारुती चितमपल्ली यांनी पक्षी संवर्धनाकरिता केलेल्या अमूल्य कार्याची दखल म्हणून यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याच निम्मिताने इको -प्रो भद्रावती तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शहरालगत असलेल्या विजासन तलाव, चिंतामणी तलाव, मल्हार तलाव, गौराळा तलाव, पिंडोनी तलाव, घोडपेठ तलाव, लेंडारा तसेच डोल्हारा या तलावांवर दररोज सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात पक्षीनिरिक्षणा सोबतच पक्षांचे निसर्गात महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण या सोबतच पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्या विषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे.
हिवाळ्याची चाहूल लागताच प्रवासी पक्षी विविध भागातून येत असतात. वर्षभर नजरेआड असणाऱ्या या रंगबेरंगी पक्ष्यांना पाहण्याची, त्यांना अभ्यासनाची व त्यांचे संवर्धन करण्याची ही सुवर्ण संधी आहे. स्थानिक पक्षानं सोबतच या प्रवासी पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी ही स्थानिक नागरिकांची आहे त्या करिता संपूर्ण आठवलाभर चालणाऱ्या या उपक्रमात विधार्त्यांनी, सामाजिक संघटनांनी, पक्षी अभ्यासकांनी तसेंच सामान्य नागरिकांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन इको -प्रो तर्फे करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.