पेगॅसस हेरगिरीने देशभर गदारोळ....!
Pegasus Spyware
चीनची घुसखोरी. त्याकडे कानाडोळा. अन् देशवासियांची हेरगिरी. हा कोणता शहाणपणा. पुलवामा झाला. 40 जवान शहीद झाले. आरडीएक्स कसं आलं. कुठून आलं. अद्याप थांगपत्ता नाही. कोणाचा हात. पाकचा۔۔ ! की आणखी कोणाचा. सत्य जाणून घेण्याचा देशाचा अधिकार. त्यावर पडदा. गुप्तचर संस्था गप्प. ना तपास. ना तपासाच्या हालचाली.अंतर्गत सुरक्षेवर इतकी उदासिनता. त्या तपासाचे भान नाही. हेरगिरी सुरु असताना पुलवामा घडलाच कसा.चीन भारताच्या हद्दीत घुसलाच कसा. हे चक्रावणारे प्रश्न. जेवढा विचार कराल. तेवढे कोमात जाल. डोकं सुन्न करणाऱ्या ह्या घटना.
भारतात भारतियांचीच हेरगिरी सुरु आहे. हे सांगतं कोण. तर विदेशी पत्रकार. त्यांती प्रतिष्ठित माध्यमं. ती सुध्दा पुराव्यानिशी. लक्ष्य कोण..! विरोधी पक्ष नेते. चाळीसांवर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, मुख्य न्यायाधीश , एनजीओ, काही उद्योजक , टॉप अधिकारी. सरकारला विरोध करणारे. 300 वर फोनची टॅपिंग झाली. महिलांनाही सोडले नाही. ते सुध्दा कुठल्या कक्षापर्यंत. काय बघितले असावे. काय ऐकले असावे. कल्पनांनीच थरकाप उडतो. ज्यांची जासूसी झाली. त्यांची काय अवस्था असेल. जरा कल्पना करा. घराला दार, खिडक्या असतात.खिडक्यांना खास कांच असतात. बाहेरून कोणाला न बघता यावे. त्यावर पुन्हा पडदे असतात. खासगी जीवनात खासगीपणा राहावा. त्यासाठी ही सर्व खबरदारी. कॉलनीत,घराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे लावले जातात. कोण आला. कोण गेला. काय केलं. त्या हालचाली टिपण्यासाठी. त्या सर्व सुरक्षा भेदल्या. त्या सर्वांना ठेंगा दाखविला. इस्रायल पेगॅसेस जासूसी यंत्रांनी. त्यांनी सरळ 300 मोबाईसमध्ये प्रवेश केला. त्यांचा ताबा घेतला. त्या मोबाईलवाल्यांची इत्थंभूत माहिती गोळा केली. त्या माहितीचा वापर नेमका कशासाठी केला. 24 तास पाळत ठेवली. तुम्ही खाता काय. तुमच्या सवयी काय. बोलता कोणाशी. काय बोलता. त्याची सर्व रिकार्डींग केली. हजारों किलोमीटर दूर बसून .छायाचित्रं टिपली . खासगीपणाचे धिंडवडे काढले . खासगीपणा हा तुमचा मुलभूत अधिकार. लोकशाहीने दिलेलं अभय. त्या अधिकाराचे चीरहरण व्हावे. ते सुध्दा बेमालूपणे..! हे कोणाला पटणार. सर्वच चित्तथरारक आहे. त्या विरोधात संताप आहे.
सरकारं पाडल्याचाही आरोप...
हेरगिरी चित्रपटातील कल्पकतेच्या एक पाऊल पुढेच. ती कल्पकता आहे. हे सत्य आहे. एवढेच नव्हे.तर कर्नाटक सरकार पाडण्यासाठी या हेरगिरीचा वापर झाला. हा गौप्यस्फोट कर्नाटकच्या कॉंग्रेस नेत्यांंनी पत्रकार परिषदेत केला. त्याचे धागे मणिपूर, गोवा, अरूणाचल, मध्यप्रदेश सरकार पाडण्यापर्यंत आहेत. देशभरात आरोपांच्या फैरी झडत आहेत. संसदेत गदारोळ आहे. या बातमीने जगभर कल्लोळ माजला. भारतभर आंदेलन पेटलं आहे. गरीब असो की श्रीमंत खासगीपण त्यांची संपत्ती. त्यावर दरोडा टाकला गेला. हा दरोडा कोणी टाकला. बाहरी शक्तींचा हात आहे की सरकारचा. हा सवाल विरोधी पक्षांचा आहे. उत्तर देणं सरकारचं काम आहे.
इस्राईलच्या एनएसए कंपनीने नवे हेरगिरी तंत्र शोधले. त्याचे नाव पेगॅसेस. Pegasus Spyware पेगॅसेस म्हणजे उडणारा घोडा. हे एक उपकरण बनविले. त्याची किंमत 50 ते 80 कोटी रुपये. एका उपकरणाने पन्नास टेलिफोनघारकांची हेरगिरी करता येतं. भारतात 300 वर व्यक्तींची जासूसी सुरु होती. हे पहिल्या तपासात आढळलं. त्यापैकी काही मोबाईलची तांत्रिक चौकशी झाली. त्यातून पुरावे गोळा करण्यात आलं. इस्रायल सरकार आणि त्यांच्या राष्ट्रातील कंपनीने असे उपकरण बनविल्याची कबुली दिली. याशिवाय ही यंत्रे केवळ सरकारला विकतो. ती सुध्दा अतिरेक्यांच्या कारवाय्यांना आळा घालणे. या मानवीहितासाठी वापर व्हावा. या अटी व शर्तीवर देतो. आतापर्यंत 40 देशांना दिले. त्यापैकी दोन देशांनी दुरूपयोग केला. त्यांची यंत्रसामुग्री निकामी केली असंही सांगितलं . मात्र कोणत्या देशांना पेगॅसेस विकले. त्यावर पडदा कायम राखला. फ्रान्सच्या फॉरबीडन स्टोरिज व एमेनेस्टी या संस्थांना फोन टॅपिंगची माहिती मिळाली. ती त्यांनी जगातल्या 17 माध्यम संस्थांना दिली. त्यात भारतातील ' दं वायर 'चा समावेश आहे. या माध्यमांतील पत्रकारांनी सतत सहा महिने तपास केला. पुरावे गोळा केले. 50000 मोबाईल हॅक केल्याचे आढळले. त्यानंतर हेरगिरिचा गौप्यस्फोट केला. पुरावे एवढे जबरदस्त आहेत की त्यांचा इंकार अशक्य आहे.
वाॅटरगेटपेक्षा मोठे प्रकरण.....
या कांडाने अमेरिकेतील वॉटरगेट कांडाची आठवण ताजी झाली. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी विरोधी पक्ष डेमोक्रेटिक नेत्यांची हेरगिरी सुरू केली होती. विरोधी पक्षाचं कार्यालय वॉटरगेट कॉम्प्लेक्समध्ये होतं. तिथे वायर टॅपिंग व्यवस्थित करण्यास पाच जण रात्रीला गेले. त्यांना सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून पेलिसांनी पकडले. त्यांच्याजवळून छुपे कॅमेरे, कॉल रेकार्डर आदी सापडले. यामागे निक्सन यांच्या निकटवर्तियांचा समावेश असल्याचे उघडकीस आले. ही बातमी वाशिंग्टन पोस्टने छापली. या बातमीचा दोन पत्रकारांनी सलग दोन वर्ष पाठपुरावा केला. अखेर 1973 मध्ये रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा निक्सनचे राष्ट्रवाद व राष्ट्र सुरक्षा भावनिक मुदेद टिकले नाहीत. त्याच पध्दतीने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधकांचा, 40 नामांकित पत्रकारांचे, सुरक्षा संस्थेचे अधिकारी ,न्यायमूर्तींचे फोन टॅपिंग झाले.दोन केंद्रीय मंत्र्यांचीही हेरगिगी केल्या गेली. त्यामुळे या प्रकरणाला वॉटरगेट कांडाची पुनरावृत्ती संबोधले जाते. हे सर्व सरकारी यंत्रणेच्या मदतीने केलं जात होतं. निक्सन यांच्यावर न्यायव्यवस्था, विरोधकांवर पाळत ठेवणे. कॉल रेकॉर्ड करणे, खोटे कागदपत्र तयार करणे आदी आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणाने निक्सन यांना पायउतार व्हावे लागले .वॉटरगेट कांडापासून शोधपत्रकारिता सुरु झाली.असं मानलं जातं.ती वायर टॅपिग होती.डिवाइस लावून संवाद ऐकला जात होता. त्या माध्यमातून माहिती गोळा करून ती विरोधकांना पराभूत करण्यास वापरली जात होती. हा लोकशाहीवर घाला होता. तिंथल्या अधिकारी, न्याय व्यवस्थेने निक्सन यांना दोषी ठरविले. हे कांड त्यापेक्षा मोठं आहे. व्याप्तीही आहे.आतापर्यंत त्याचे दहा देशात धागेदोरे आढळले.
फ्रान्समध्ये चौकशी सुरु
राफेल विमान ज्या् फ्रान्सकडून घेण्यात आले.त्या देशात 37 फोन हॅक करण्यात आले. त्यात राष्ट्रपती माक्रो यांच्या बरोबर सरकारी यंत्रणेतील 15 जणांची हेरगिरी करण्यात आली असा संशय आहे. भारतासोबतच बहरिन,कजाकिस्थान,अजरबैजान, मैक्सिको, मोरक्का,रवांडा,सयुक्त अरब अमिरात, सऊदी अरब, हंगरीत हेरगिरी उजेडात आली. फ्रान्स सरकारने हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.
पेगॅसेस तंत्राच्या मदतीने मोबाईलमध्ये स्पायवेअर सोडला जातो. हा संदेश किंवा मिस कॉलने टाकला जातो. त्यामुळॆ फोन बंद असला तरी पासवर्डसह डाटा हॅक केला जातो. चोरमार्गे हेरगिरी सुरु असते. याच पध्दतीने भीमाकोरेगाव प्रकरणातील चळवळ्यांच्या लॅपटॉपमध्ये मेलवेअरच्या माध्यमातुन आक्षेपार्ह मजकूर टाकला. त्या आधारे खोटे गुन्हे नोंदविले. हा कट त्या पेगॅसेसच्या माध्यमातून रचला गेला असावा. याबाबत संशय बळावला आहे. कारण पहिला गुन्हा शिक्रापूर ठाण्यात नोंदविला. एका आठवड्यानंतर तीस किलोमीटर दूर पुण्यात दुसरा गुन्हा नोंदविला. त्यासाठी एका तरुणास तक्रार करावयास लावली. या तक्रारकर्त्याचा घटनेशी काय संबंध याचीही चौकशी झाली नाही.अमेरिकेच्या लॅबने मेलवेअरच्या माध्यमातून अनेकांच्या लँपटॉपमध्ये मजकूर घुसविण्यात आला.असा अहवाल अगोदरच दिला आहे. ही बातमी दोन भागात वाशिग्टन पोस्टने जून महिन्यात छापली . पेगॅसेस हेरगिरी सोबत भीमाकोरगाव कटावरील पडदे उघडतील. या हेरगिरीची चौकशी लवकर व्हावी. विरोधी पक्ष आक्रमक आहे. सत्ताधारी बॅकफुटवर आहेत. हेरगिरी झाली की नाही.यावर सरकार बोलत नाही.संसदेत व रस्त्यावर काँग्रस व विरोधी पक्षांचा गदारोळ चालू आहे.
-भूपेंद्र गणवीर
...................BG.....................