Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०६, २०२०

सावधान: MSEB मध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणा-यांपासून सावध राहा:महावितरण

mseb साठी इमेज परिणाम
नागपूर/प्रतिनिधी: 
महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवित पैसे उकळणा-या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सोलापूर परिसरातील काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून असे प्रलोभन दिले जात असल्याचे आढळून आले आहे. महावितरणमध्ये अस्तित्वात नसलेल्या पदांसाठीही निवड करण्याचे प्रलोभन दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई येथून संपर्क करीत असल्याचे उमेदवारांना सांगितले जाते आणि निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न होत आहेत. 

काही पदे महावितरणमध्ये अस्तित्वात नाहीत, अशाही पदांसाठी निवड पत्राचे प्रलोभन दाखविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र महावितरणकडून संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान तसेच निवड पत्र किंवा रूजू होण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होत आहे. या भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय नोकर भरतीची जाहिरात, पदसंख्या, आरक्षित पदे, लेखी परीक्षेचा संभाव्य दिनांक, लेखी परीक्षेसाठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी, परीक्षेत उत्तीर्ण व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादी आदींची सर्व माहिती संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाते.

 यासोबतच संबंधित उमेदवारांना नोंदणी केलेल्या त्यांच्या ई-मेलवर व मोबाईलवरही भरती प्रक्रियेबाबतची माहिती दिली जाते. निवड झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते व संबंधीत उमेदवारांना इमेलद्वारे व लेखी पत्राद्वारे कळविले जाते. महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रलोभनासाठी आर्थिक मागणी करणा-या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.