Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०६, २०२०

108 अंबुलन्स सेवा पुरविणाऱ्या BVG India Ltd. कंपनीच्या मनमानी कारभाराची चौकशी करा

मनसेची जिल्हाधिकारी यांना मागणी..!




नागपूर/प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात व नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या नेतृत्वात आज मनसे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्री.रविंद्र ठाकरे यांची भेट घेऊन BVG कंपनीच्या चालक व डॉक्टर्स लोकांची कंपनी प्रशासनाकडून कशी पिळवणूक होत आहे याबाबत माहिती देऊन निवेदन सादर केले. कुठल्याही कर्मचारी वर्गाने कंपनीच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उचलल्यास कंपनी तर्फे दबावतंत्र वापरून त्याला तात्काळ निलंबित केले जाते अथवा शिक्षा म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात कामावर पाठविले जाते, अंबुलन्स सेवेत चालक सोबत डॉक्टर हजर राहणे कंपनीसाठी बंधनकारक आहे पण कामावर डॉक्टर हजर नसतांना सुद्धा कंपनी व्यवस्थापक चालक वर्गास रुग्ण आणण्यासाठी कॉल घेण्यास अलिखितपणे दबाव टाकतात जे कायद्याला अनुसरून नाही.  हजर डॉक्टरांची खोटी यादी दाखवून कंपनी राज्य सरकारची दिशाभूल करीत आहे.    प्रत्येक कार्यरत अंबुलन्सवर २४तासात ३डॉक्टर+३चालक कामावर असणे कंपनीसाठी बंधनकारक आहे पण अपुरी मनुष्यबळ संख्या ठेवून अतिरिक्त कामाचे तास कार्यरत कर्मचारी वर्गावर लादले जातात, ग्रामीण दुर्गम भागात कामावर हजर कर्मचारी वर्गास साधा निवारा सुध्दा उपलब्ध करून दिला जात नाही.तुटपुंज्या पगारावर काम करणारा गरीब चालकवर्ग कंपनीच्या या व ईतर अनेक मनमानी कारभारामुळे मनस्ताप सहन करीत आहे.कामाचे तास, नौकरीचे करारपत्र, पीएफ, जीवनविमा,अतिरिक्त कामाचे भत्ते, याबाबत कंपनी व्यवहारात अस्पष्टता असून चालकवर्गास नीट माहिती दिली जात नाही. कामगार कायद्याला अनुसरुन कंपनीचा व्यवहार नसल्यामुळे याविरोधात मनसेने मा.सहाय्यक कामगार आयुक्त श्री राजदीप धुर्वे यांचेकडे प्रकरण दाखल केले असून अद्याप कंपनीने आपले लेखी उत्तर सादर केले नाही आणि प्रलंबित प्रकरणात प्रतिनिधी मार्फत हजर पण झाली नाही. यामुळे कंपनीच्या कारभारावर राज्य सरकारतर्फे लक्ष ठेवण्यासाठी गठीत जिल्हानिहाय नियंत्रण समितीचे सदस्य १.मा.जिल्हाधिकारी २.मा. सिव्हिल सर्जन ३.मा.उप संचालक, आरोग्य विभाग यांनी या गंभीर विषयावर तातडीने लक्ष घालावे व कंपनीच्या मनमानी कारभाराला कायदेशीर आळा घालावा जेणेकरून कंपनीच्या चालक वर्गास न्याय मिळेल अशी मागणी मनसे शिष्टमंडळाने केली. मा.जिल्हाधिकारी व बैठकीला उपस्थित असलेले *सिव्हिल सर्जन मा. डॉ.देवेंद्र पातूरकर* यांनी या विषयाची गंभीरपणे दखल घेतली व कामगार आयुक्तांशी तात्काळ चर्चा करून चालक वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील यासाठी आवश्यक निर्देश प्रशासनातर्फे दिले जातील असे आश्वासन *जिल्हाधिकारी श्री रविंद्र ठाकरे* यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसे शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर संघटक अमजद शेख, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर विभाग अध्यक्ष अंकुश भेलकर व अक्षय दहीकर, विभाग सचिव सुधीर बोरीकर, विभाग उपाध्यक्ष अमर काळे,शहर उपसंघटक विशाल इंगळे, विभाग उपसंघटक संदेश मोहोड, प्रभाग अध्यक्ष संदीप चवरे, प्रभाग उपाध्यक्ष अनिकेत दहीकर, मंगेश जुमडे सहित अन्य चालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.