Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

mahavitaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mahavitaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

केडगाव विभागाची धाडसी कामगिरी ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई:
वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल व पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद केला होता तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.

महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या उच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरु केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. सदरची वीजचोरी मोठी असल्याने व संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. २५ ऑगस्टला संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन त्यांनी एका मित्राच्यासह आत प्रवेश मिळवला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रिकरण सुरु केले व तोच बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.

मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०४९४४०) या ग्राहकाला ४७३२९० युनीट वीजचोरी पोटी १ कोटी ११ लाख १९ हजार ८५७, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. (ग्रा.क्र. १८४८१९०२१८९२) या ग्राहकाला २०५६०६ युनीट चोरीचे ५१ लाख ३४ हजार ९७० तर मे.श्री. भगवान ट्यूब प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०३३४४०) या ग्राहकाला २३४९६१ युनीट चोरीसाठी ४२ लाख २५ हजार १६४ रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून २ कोटी ४ लाख ७९ हजार ९८८ रुपये दंडाचे बील कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय विद्युत अधिनियम २००३ कलम १३५ व १३८ नुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा व वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहा. अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे व ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली. महावितरणने पकडलेल्या या वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

गुरुवार, जुलै २७, २०२३

 पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

नागपूर :
 महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दि. 31 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज बिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यावरील रकमेच्या वीज बिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध दि. 1 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात येणार असून त्यानंतर कुठल्याही वीज ग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाईन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केंव्हाही व कुठूनही करु शकतो. सदर पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाईन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के (जास्तीत जास्त 500 रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास 1 टक्का असे एकूण 1.25 टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायांव्दारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2077 च्या तरतुदी असल्याने

पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सुचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

रविवार, जुलै २३, २०२३

  सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

नागपूर: 
घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची नागपूर जिल्हातील संख्या तब्बल 16 हजार 192 झाली आहे. व त्यांच्याकडून एकूण 172 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प क्षमतेनुसार 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीज वापरामुळे ग्राहकाच्या वीजबिलात मोठी कपात होते. याशिवाय या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंग द्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते.

ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. सोबतच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. यामुळे ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०

 लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

Amnesty scheme for people whose power supply has been permanently  disconnected | Pune News - Times of India
चंद्रपुरात ५४५२ तर गडचिरोली जिल्ह्यात ४,८११८ ग्राहकांना लाभ
नागपूर(खबरबात):
कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यामुळे सर्वच व्यवहार बंद असतांना या काळात महावितरणने मात्र ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देताना सुमारे २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे.या काळात विदर्भात एकूण ७१ हजार ४२५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली त्यात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक १,९७९ वीज जोडण्या या चंद्रपूर विभागात देण्यात आल्या. या विभागात चंद्रपूर शहराचा समावेश होतो. बल्लारशा विभागात १,८७५ आणि वरोरा विभागात १,५९८ वीज जोडण्या देण्यात आल्या. गडचिरीरोली जिल्ह्यात एकूण ४,८१८ वज जोडण्या देण्यात आल्या. आल्लापल्ली विभागात सर्वाधिक १,९२६, ब्रम्हपुरी विभागात १,२७३ आणि गडचिरोली विभागात १,६१९ वीज जोडण्या देण्यात आल्या.

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉक डाउन लावण्यात आले.त्यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती होती. याही काळात सर्व खबरदारी घेऊन जीवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत ठेवला. हे करत असतानाच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी पाहिजे होती, अशा ग्राहकांना तातडीने यंत्रणा उभारून वीज जोडणी दिली.

राज्यात १ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० या काळात विविध योजनेतून २ लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. विदर्भात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.अकोला परिमंडलात-१३,९३७, अमरावती-१४,८११, औरंगाबाद-१४,३९०,बारामती-२४,५३७,भांडुप-१८,२५९,चंद्रपूर-१०,२७०,गोंदिया-९,८७२,जळगांव-१६,६२१, कल्याण ३१,२०५,कोकण-७,५१०,कोल्हापूर-२०,२०२,लातूर-१५,६६२ आणि नांदेड परिमंडलात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली.

महावितरण कडून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी www.mahadiscom.in या महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल अँप द्वारे अर्ज करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेता येईल.अशी माहिती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

अचूक बिल व इतर सुविधेसाठी ग्राहकांनीही स्वतः मीटर रिडींग पाठवावे:ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार

अचूक बिल व इतर सुविधेसाठी ग्राहकांनीही स्वतः मीटर रिडींग पाठवावे:ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार

महावितरणचे निम्मे ग्राहक डिजिटल | eSakal
रिडींग पाठविण्यासाठी 
आता पाच दिवसांची मुदत
चंद्रपूर /खबरबात:
महावितरण कडून ग्राहकांच्या वीज मीटरचे नियमित रिडींग घेण्यात येते. ही प्रक्रिया सुरूच आहे.परंतु वीज बिल अधिक अचूक असावे आणि रिडींगची पडताळणी ग्राहकांना करता यावी म्हणून ग्राहकांना स्वतःच्या वीज मीटरचे रिडींग स्वतः सुलभतेने पाठविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना रिडींग कडे लक्ष ठेवून त्यानुसार वीज बिलाची,सदोष मीटरची तसेच वीज वापराची पडताळणी करता येणे शक्य आहे. 
तसेच ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्यासाठी पूर्वी चार दिवसांची असलेली मुदत ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशानुसार आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अचूक बिलासाठी स्वतः रिडींग पाठवावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक (प्र.) सुहास रंगारी यांनी केले आहे. 

ग्राहकांना वीज मीटर रिडींग पाठवण्यासाठी पूर्वी चार दिवसांची मुदत होती परंतु ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ग्राहकांना स्वतःचे मीटर रिडींग पाठविणे सोयीचे व्हावे यासाठी ही मुदत वाढविण्याचे निर्देश महावितरणला दिले होते. त्यानुसार आता रिडींग पाठविण्याची मुदत पाच दिवस पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
ग्राहकांना मीटर रिडींग पाठविण्यासाठी सर्वप्रथम महावितरण मोबाईल अँप डाऊनलोड करणे तसेच ग्राहक क्रमांकासोबत हा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. महावितरण मोबाईल अँप मध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे, तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा.
 त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग अँप मध्ये रिडींग नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अँप मध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास त्यांना अनेक फायदे होणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल.

 वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. या शिवाय शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. त्यामुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग महावितरणकडे पाठवावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक (प्र.) सुहास रंगारी यांनी केले आहे.