Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०३, २०२०

बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय ?

  बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय ? 


.        दि. ३ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/3btMkb2
आता डिजिटल युगात पंच करणारी तिकीटे कालबाहय झाली आहेत. तरीही लहानपणापासुन उत्सुकता होती. तिकीटाला पंच का करतात?
  .         एस. टी. बसमधुन प्रवास  करताना तिकिटांना छिद्रे पाडण्यामागे काय कारण किंवा लॉजिक असेल ह्याचे आपल्यापैकी अनेकांना कायम कुतूहल वाटते.

आता तर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आल्यापासून ते साधे तिकीट मिळणे फार कमी झाले आहे. परंतु जेव्हा जेव्हा साधे तिकीट मिळते तेव्हा त्यांना छिद्रे पाडलेली असतात.आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ह्यामागे कारण असू शकेल?
वेगवेगळ्या शहरांत किंवा महामंडळातील तिकिटे वेगवेगळ्या प्रकारची असतात. परंतु सर्वच तिकिटांवर काही माहिती मात्र सारखीच असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, ती म्हणजे एकूण प्रवास भाडे, सिरीज नंबर (प्रत्येक सिरीजमध्ये ९९९९९९ इतकी तिकिटे असतात), सिरीयल_*  *_नंबर, तिकीटाची वैधता दर्शवण्यासाठी काहीतरी खुण व बस सेवा देणाऱ्यांची माहिती. तसेच तिकीट काढतानाची तारीख व वेळ अश्या गोष्टी तिकिटावर असतात.मॅन्युअल तिकिटांवर स्टेज नंबर असतात. प्रवासी जितक्या स्टेजेस प्रवास करतील त्यानुसार प्रवाश्यांना भाडे आकारणी होते. ह्या स्टेजेसचे भाडे साधारणपणे महामंडळ ठरवते. दोन स्टेजेस मध्ये किती अंतर आहे ह्यावर हे भाडे ठरते._*
*_तसेच बस सेवा कुठली आहे म्हणजे साधी आहे की आराम की निमआराम बस आहे ह्यावर सुद्धा भाड्याचा दर ठरतो._*
ह्या प्रवासाच्या स्टेजेसना नंबर दिलेले असतात. आणि हे स्टेज नंबर्स बदलत नाहीत. म्हणजेच बस जर मुंबईहून नागपूरला जात असेल तर मुंबई स्टेज १ असेल आणि नागपूर स्टेज १० (फक्त उदाहरण म्हणून बघा).
आता हीच बस नागपूरहून मुंबईला परत जात असेल तरी स्टेज नंबर बदलत नाहीत. मुंबई ही स्टेज १ व नागपूर हे स्टेज १०च राहील.
कंडक्टरला प्रत्येक स्टेजच्या शेवटच्या थांब्यानंतर ती स्टेज “क्लोज” करावी लागते. उदाहरणार्थ A ते J असा दहा थांब्यांचा एक सेक्शन आहे. त्यात A स्टेज १ आहे , D ही स्टेज २ आहे , G ही स्टेज ३ आहे व J ही स्टेज ४ आहे. तर कंडक्टरला C ह्या थांब्यानंतर स्टेज क्लोज करावी लागेल.
स्टेज क्लोज करण्यासाठी कंडक्टर C ह्या थांब्यापर्यंत विकल्या गेलेल्या तिकिटांचा सिरीयल नंबर त्याच्याकडच्या नोंद वहीत लिहून ठेवतात. ही सिस्टीम तिकीट विक्रीचा एक विशिष्ट पॅटर्न कायम ठेवण्यासाठी वापरली जाते.
परंतु बेस्ट आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील बस सेवा ही क्लोज करण्याची सिस्टीम वापरत नाहीत. हे कंडक्टर जितक्या तिकिटांची विक्री झाली आहे त्यांची एन्ट्री अगदी शेवटी त्यांच्याकडच्या नोंदवहीत करतात.
काही महामंडळात तिकिटांवर “फ्रॉम” स्टेज आणि “टू” स्टेज लिहिलेली असते तर काही तिकिटांवर फक्त “फ्रॉम” स्टेज लिहिलेली असते.
तर काही महामंडळातील तिकिटांवर स्टेज नंबर दिलेलेच नसतात. आपले महाराष्ट्र राज्य महामंडळाचे व KSRTC चे बस तिकीट जवळपास सारखेच असते. ह्यात जे एक ते नऊ हे जे नंबर आहेत ते स्टेज नंबर आहेत.
ह्या तिकिटावर कंडक्टर १९९ व्या स्टेज पर्यंत पंच करू शकतात. १९९ साठी ते डावीकडे सर्वात वरच्या १ ह्या आकड्यावर पंच करतात.
उदाहरणार्थ एखाद्या प्रवाष्याचे तिकीट हे १०३ ते ७५ ह्या स्टेजपर्यंतचे असेल तर कंडक्टर तिकिटावरील डाव्या बाजूला “पासून”च्या बाजूला जो १ हा आकडा आहे त्यावर पंच करतील तसेच त्याच कॉलममधील ० व ३ ह्या आकड्यांवर पंच करतील आणि उजवीकडे “पर्यंत” चा जो कॉलम आहे त्यातील ७ व ५ ह्या आकड्यांवर पंच करतील.
अनेक महामंडळात फक्त “फ्रॉम” स्टेज पंच करण्याची पद्धत आहे. ह्यातसुद्धा अनेक पद्धती आहेत. मुंबईत बेस्टमध्ये प्रवास करणाऱ्यांनी पाहिले असेल तर तुमच्या अप च्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते तर त्याच दोन ठिकाणांदरम्यानच्या डाऊनच्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते.
इनमराठी वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.