हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे !
. 📯 दि. ७ सप्टेंबर २०२० 📯
फेसबुक लिंकhttps://bit.ly/325UyD0
. हिसार :हरियाणातील हिसार गावातील राखीगढीमध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातील काही अवशेष सापडले होते. त्यामध्ये मानवी सांगाड्यांचाही समावेश होता. हे सांगाडे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचे डीएनए दक्षिण भारतीय लोकांच्या डीएनएशी साधर्म्य दाखवणारे आहेत. तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या उत्खननात हे सांगाडे सापडले होते. .
या उत्खननावेळी सात हजार वर्षांपूर्वीच्या काही वस्तूही सापडल्या आहेत. आता या नव्या संशोधनाने सिंधू संस्कृतीबाबत काही नवे शोधलागू शकतात. येथील सांगाड्यांमधून जर्मनीतील काही संशोधकांनी डीएनएचे नमुने घेतले होते. हे सांगाडे हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ठेवून त्यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यामधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. हडप्पाकालीन लोक व्यापारासाठी देशाच्या विविध भागांत जात असावेत, असेही यामधून दिसून आले आहे. त्यांचे डीएनए द्रविड लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहेत.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛