Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०७, २०२०

तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?

 तुम्हाला  माहिती आहे का,  आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?   


फेसबुक लिंकhttps://bit.ly/2ReuteZ
        चांद्रयान २ चे यान चंद्रावर उतरण्यास अयशस्‍वी ठरल्‍याने देशावर एक प्रकारची निराशा पसरली. मात्र, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्‍था नासाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास गेल्‍या सहा दशकांमध्ये चंद्र मोहिमांमध्ये 60 टक्के यश आले आहे. नासाच्या मते या दरम्‍यान १०९ चांद्र मोहिमा सुरू करण्यात आल्‍या. यातील ६१ मोहिमा यशस्‍वी ठरल्‍या, तर ४८ मोहिमा अयशस्‍वी ठरल्‍या.

तुम्हाला  माहिती आहे का,  आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?

भारतीय अंतराळ संशोधन संस्‍था इस्रोकडून चांद्रयान २ मोहिमेतंर्गत चंद्रावर सोडलेले विक्रम लँडर काल मध्यरात्री चंद्राच्या पृष्‍ठभागावर उतरणार होते. मात्र, दुर्दैवाने काही वेळ आधीच या लँडरचा पृथ्‍वीशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्‍का बसला. मात्र इस्रोच्या अधिकार्‍यांच्या म्‍हणण्यानुसार चांद्रयान - २ चा ऑर्बिटर पुर्णपणे सुरक्षित आहे.
या आधी अनेक राष्‍ट्रांनी चांद्रमोहिमा आखल्‍या. इस्राईलने २०१८ मध्ये चांद्र मोहिम सुरू केली. मात्र, ती एप्रिलमध्ये नष्‍ट झाली. नासाच्या मते, १९५८ पासून २०१९ पर्यंत भारतासह अमेरिका, रशिया, जपान, युरोपीय संघ, चीन आणि इस्राईल या देशांनी विविध चंद्र मोहिमा आखल्‍या. पहिली चंद्र मोहिमेची योजना अमेरिकेने १७ ऑगस्‍ट १९५८ मध्ये आखली. मात्र, पायोनियर लॉंच करणे अयशस्‍वी ठरले.
*पहिले यशस्‍वी चंद्र अभियान चार जानेवारी १९५९मध्ये सोव्हिएत संघाचे लूना १ होते. हे यश सहाव्या चंद्र अभियानामध्ये मिळाले. यानंतर ऑगस्‍ट १९५८ पासून नोव्हेंबर १९५९ च्या दरम्‍यान अमेरिका आणि सोव्हिएत संघाने १४ अभियाने सुरू केली. यामधील लूना-१, लूना-२, लूना-३ हे तीनच यशस्‍वी ठरले. हे सर्व सोव्हिएत संघानेच सुरू केले*
*यानंतर जुलै १९६४ मध्ये अमेरिकेने रेंजर ७ मिशन सुरू केले. ज्‍याने पहिल्‍यांदा चंद्राचा जवळून फोटो घेतला. रशियाकडून जानेवारी १९६६ मध्ये सुरू केलेल्‍या लूना-९ मोहिमेने पहिल्‍यांदा च्रंद्राच्या जमिनीला स्‍पर्श केला. यावेळीच चंद्राच्या पृष्‍टभागाची पहिल्‍यांदा छायाचित्रे मिळाली. पाच महिन्यातच १९६६ मध्ये अमेरिकेने यशस्‍वीरित्‍या सर्वेयर-1 हे अभियान यशस्‍वी केले.
अमेरिकेची अपोलो ११ ही एक महत्‍वाची मोहिम होती. या माध्यमातून मानवाचे पहिले पाऊल चंद्रावर पडले. या तीन सदस्‍यीय मोहिमेचे संचलन नील आर्मस्‍ट्रांगने केले. १९५८ ते १९७९ या काळात अमेरिका आणि युएसआरनेच चंद्र मोहिमा सुरू केल्‍या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० मोहिमा सुरू केल्‍या. यानंतर जपान, युरोपीय संघ, चीन, भारत, इस्राईलनेही या क्षेत्रात आपले पाऊल ठेवले.**जपान, यूरोपीयन युनियन, चीन, भारत आणि इस्राईल या देशांनी या क्षेत्रात उशिरा पदार्पण केले. जपानने १९९० मध्ये आपली पहिली चंद्र मोहिम हिटेन लॉन्च केली. सप्टेंबर २००७ मध्ये जपानने आणखी एक ऑर्बिटर मोहिम सेलेन लॉन्च केले. सन २००० पासून २००९ च्या दरम्‍यान आतापर्यंत ६ लूनार मिशन लॉन्च करण्यात आल्‍या. यूरोप स्‍मार्ट -१ जपान सेलेन, चीन- शांग ई १, भारत - चांद्रयान, अमेरिका-लुनार.*२००९ पासून २०१९ च्या दरम्‍यान १० मोहिमा लॉन्च करण्यात आल्‍या. ज्‍यामधील ५ भारताने, ३ अमेरिकेने, चीन आणि इस्राईलने प्रत्‍येकी १ मिशन लॉन्च केले. १९९० पासून आतापर्यंत अमेरिका,जपान, भारत, यूरोपियन युनियन, चीन आणि इस्राईलने १९ लुनार मोहिमा लॉन्च केल्‍या.
____________________________


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.