गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर भास्कराचार्याने लावला
भास्कराचार्यांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला. ‘विज्जलविड’ हे त्यांचे जन्मगाव. खानदेशातील चाळीसगावजवळ पाटण नामक गाव आहे. ते भास्काराचार्यांचे जन्मगाव; असेही काही संशोधकांचे मत आहे. तेथे ‘पाटणादेवी’ ही त्यांची कुलदेवता आहे. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी तसा उल्लेख केला आहे.आपण असे मानतो की, गुरुत्वाकर्षणा’चा शोध न्यूटनने लावला. पण हे चुकीचे आहे. गुरुत्वाकर्षणा’चा शोध न्यूटनच्या आधी १२०० वर्षे अगोदर थोर भारतीय गणिततज्ञ भास्कराचार्य यांनी लावला आहे.
पण अज्ञानाने म्हणा किंवा वर्चस्व दाखविण्यासाठी परकीय लोक हे श्रेय न्युटनला देतात.
जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनच्या डोक्यावर एक सफरचंद पडले तेव्हा कुतूहलापोटी न्यूटनने संशोधन केले आणि त्याने गुरुत्वाकर्षणाची संकल्पना मांडली ही गोष्ट संपूर्ण जगाला ठाऊक आहे. परंतु भास्कराचार्यांनी मात्र १२ व्या शतकातच गुरुत्वाकर्षणाशी निगडीत गोष्टींचा उलगडा केला होता हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून दिसून येते.
भास्कराचार्य हे १२ व्या शतकातील अतिशय विद्वान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितीतज्ञ होते. त्यांनी ११५० या शतकामध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी ‘सिद्धांत शिरोमणी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामधील काही श्लोकांमध्ये गुरुत्वाकर्षणाशी निगडीत बाबींचा स्पष्ट उल्लेख आढळतो.
💫 आकृष्टिशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥
याचा अर्थ असा,
💫पृथ्वी आपल्या आकाशातील पदार्थ स्वशक्तीने आपल्याकडे खेचून घेते त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो. परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कोणीही खाली पडत नाही.
यावरून सिद्ध होते की पृथ्वीमध्ये वरून पडणारा पदार्थ स्वत:कडे खेचण्याची कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे याबद्दल भास्कराचार्यांना खात्री होती. सदर उल्लेख हा सिद्धांतशिरोमणी भूवनकोश ६ मध्ये आढळतो.पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख त्याने ‘आकृष्टशक्ती’ असा केला आहे. पृथ्वीला भूगोल म्हणताना, पृथ्वी गोल असूनही सपाट का भासते, याचे सुगम विवेचनही त्याने केले. ग्रहांची गती मोजण्यासाठी त्याने, आधुनिक कलनशास्त्रातील कल्पनांचा वापर केला.
भास्कराचार्यानी आपल्या शिक्षणाबद्दल एक श्लोक लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की त्यांनी आठ व्याकरणग्रंथ, बहुधा पाणिनीची अष्टाध्यायी, सहा वैद्यकग्रंथ, सहा तर्कशास्त्रग्रंथ, पाच गणितग्रंथ, चार वेद, पाच भरतशास्त्रे आणि दोन मीमांसा ग्रंथ अभ्यासले. अगदी आधुनिक युगातील बुद्धिमान व्यक्तीलाही तरुण वयात एवढे प्रचंड शिक्षण आत्मसात करणे केवळ अशक्य आहे.
सन ११६३ मध्ये त्यांनी “करण कुतूहल” नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात लिहिले आहे की जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि जेव्हा पृथ्वीची छाया चंद्राला झाकते तेव्हा चंद्रग्रहण होते. हा पहिला लिखित स्वरूपातील पुरावा हे दर्शविण्यास पुरेसा आहे की त्या काळाच्या भारतीयांना गुरुत्वाकर्षण, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांची नीट माहिती होती.
केवळ हाच नाही तर असे अनके शोध प्राचीन भारतामध्ये लावले गेले होते आणि वेदामध्ये आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये हे सर्व संदर्भ सापडतात.
विद्वान, लोकांच्या वंदनाला पात्र, गणितात शिवासारखा, वेदविद्या, छंदशास्त्र, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शनाचा ज्ञाता, कविवृंद, सर्वज्ञ, पुण्यान्वित अशा विविध विशेषणांनी भास्कराचार्यांचा गौरव केला जातो. सिद्धान्तशिरोमणी, करणकुतूहल, सर्वतोभद्रयंत्र, वसिष्ठतुल्य आणि विवाहपटल असे आणखी पाच ग्रंथ भास्कराचार्यानी लिहिले. त्यापैकी पहिले दोन ग्रंथ आज उपलब्ध आहेत. तर भास्कराचार्याचा लीलावती हा ग्रंथ सर्वात लोकप्रिय आहे. गणित मनोरंजक करून कसे शिकवावे याचा तो एक आदर्श नमुना आहे. त्यामुळे लीलावतीने अगोदरच्या सर्व गणित ग्रंथांना मागे सारून अग्रस्थान मिळविले होते. लीलावतीमधील गणिते मनोरंजक करण्यासाठी भास्कराचार्यानी अनेक पशुपक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. सर्प, मोर, वानर, भुंगे, पावसाळी मेघ, मानस सरोवर अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. लीलावती ग्रंथात भास्कराचार्यानी एक परार्ध म्हणजे दहाचा सतराव्या घातापर्यंतच्या सर्व दशगुणोत्तरी संख्यांची नावे दिली आहेत. पायथागोरस सिद्धान्ताची सिद्धता केवळ चार पदांमध्ये दिली आहे. आज ज्याला डायफंटाइन इक्वेशन म्हणतात त्याला भास्कराचार्यानी कुट्टक असे नाव दिले आहे. कुट्टक समीकरण Ax+by=c अशा प्रकारचे असते. हे समीकरण सोडवण्याची भास्कराचार्याची पद्धत अतिशय सोपी आहे. पाय या गुणोत्तराच्या सूक्ष्म व स्थूल किमती भास्कराचार्य देतात.
भास्कराचार्य काळाच्या फार पुढे होते. आज "पेल्स इक्वेशन' म्हणून जे समीकरण ओळखले जाते, ते भास्कराचार्यांनी 1150 मध्ये चक्रवाल पद्धतीने सोडविले. तेच समीकरण सोडविण्यासाठी युरोपीय गणितज्ञांना सुमारे ६०० वर्षे वाट जावी लागली.भास्कराचार्याने अपरिमेय (इरॅशनल) संख्यांच्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि वर्गमूळ या सहा प्रकारच्या क्रियांचे स्पष्टीकरण दिले. एखाद्या संख्येला शून्याने भागल्यास येणाऱ्या राशीला ‘खहर’ राशी ही संज्ञा त्याने दिली. गणिती अनंताच्या (इन्फिनिटी) कल्पनेच्या दिशेने होणारी ही वाटचाल होती. बीजगणितातील अव्यक्तांसाठी (अननोन) क्ष, य अशा प्रकारची अक्षरे मानण्याची पद्धत भास्कराचार्यानेच सुरू केली. क्ष आणि य असे दोन अव्यक्त असलेली अनिर्धार्य (इंडिटरमिनेट) समीकरणे सोडवण्याचे आधीच्या भारतीय गणितज्ञांचे प्रयत्नही त्याने पूर्ण केले. तसेच त्याने क्ष आणि य असे दोन अव्यक्त असणारी द्विघाती (क्वाड्रॅटिक) अनिर्धार्य समीकरणे सोडवण्यासाठी चक्रवाल (सायक्लिक) पद्धत तयार केली.
भास्कराचार्यांचे गणित व खगोलशास्त्र यातील योगदान अतुलनीय आहे. भारताने त्यांच्या सन्मानार्थ 7जून 1969 रोजी आकाशात सोडलेल्या उपग्रहाला भास्कर- 1 व दिनांक 20 नोव्हेंबर 1981 रोजी सोडलेल्या उपग्रहाला भास्कर 2 असे नाव देऊन जगभरामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेले पिंपळगाव हरेश्वर येथे थोर गणितज्ञ भास्कराचार्य व त्यांची कन्या लिलावती यांची समाधी आहे.
:::::∴━━━✿━━━∴::::