संगीत ऐकल्यावर माणसाला नाचावेसे का वाटते ?
. दि. २ सप्टेंबर २०२०
. 💃🏻🕺🏻 चांगल्या ठेक्याचे संगीत ऐकताच नाचता न येणार्यांनाही नाचावेसे वाटत असते. अनेकजण लग्नसमारंभात किंवा अगदी गणपतीच्या मिरवणुकीतही नाचत असतात. नृत्यकला अवगत नसतानाही आपण नाचावे असे का वाटत असते, याचेही कुतुहल संशोधक मंडळींना वाटत होते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आणि याला संगीताचा ‘बास’ जबाबदार आहे, असे त्यांना दिसून आले.
क्ष💃🏻🕺🏻या संशोधनासाठी त्यांनी कमी आणि उच्च आवृत्तीच्या आवाजांचा म्हणजेच लो-फ्रीक्वेन्सी आणि हाय-फ्रीक्वेन्सी साऊंडचा मेंदूवर होणार्या परिणामाचा अभ्यास केला. याच आवाजांनी संगीताची ‘र्हिदम’ तयार होत असते.मेंदूमधील याबाबतच्या हालचाली समजून घेण्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफीचा वापर करण्यात आला. संशोधकांना असे दिसून आले की, मेंदूची प्रत्येक क्रिया संगीताच्या धूनच्या आवृत्तीवर अवलंबून असते. जर एखाद्या गाण्यात वरचा बास असेल तर पाय थिरकण्यासाठी उत्सुक होतात आणि लोक अधिक नाचतात! हे संशोधन काही विशिष्ट वैद्यकीय स्थितीला समजण्यासाठी आणि उपचारासाठीही उपयुक्त ठरू शकते, असे त्यांना वाटते.
____________________________