जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर उपविभागात गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने एल. सी. बी. पुणे ग्रामीण कडील टीम पेट्रोलिंग करीत होती. त्याच वेळी घरफोडीतील आरोपीस पकडण्यात यश आले,
जुन्नर पो. स्टे. गु.र.नं. 422/2020 भा. दं. वि. कायदा कलम 457,380* चा समांतर तपास करताना त्यातील बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा दिलीप नारायण केदार वय-25 वर्षे, रा. पिराचीवाडी-निमदरी ता. जुन्नर, जि. पुणे याने केल्याची माहिती मिळाली.
त्यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यासोबतच जुन्नर पो.स्ट. गु. र.नं. 423/2020 भा. द. वि. कायदा कलम 457,380 मधीलही घरफोडी केल्याचीही कबुली दिल्याने दोन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पो. ना. दीपक साबळे, पो. हवा. शरद बांबळे, स.फौज. दत्तात्रय जगताप, पो.हवा. शंकर जम, चालक पो.हवा. काशीनाथ राजपुरे, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना. चंद्रकांत जाधव, यांचे पथकाने केली.