Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०३, २०२०

महावितरणने सर्वसामान्यांच्या जखमेवर चोळले मिठ mseb issue





साहेब, लॉकडाऊनमधील विज बिल माफ करा!
शिरसगाव परिसरातील नागरिकांची मागणी
रमेश दिक्षीत

शिरसगाव पांढरी (ता. नेर जि. यवतमाळ) :
संपूर्ण राज्यात ताळेबंदी जाहिर झाल्यामुळे सर्वसामान्यांसह रोजमजूरी करणा-यांचे रोजगार बुडाले आहे. परिणामी, बेरोजगारी वाढली. उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यातच कोरोनामुळे हाताला काम मिळेनासे झाले आहे. ग्रामीण खेडे गावातील लघू व्‍यवसाय गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प पडले आहेत. जगावे कसे या विवंचनेत व्‍यवसायिक अडकले आहेत. मात्र, महावितरण कंपनीने विज ग्राहकांना अव्‍वाच्या सव्‍वा विज बिल देवून सर्वसामान्यांच्या, रोजमजूरी करणा-यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. ही देयके परिसरातील तीन महिने पोहोचली देखील नाहीत. एकवेळी आलेली रक्कम सर्वसामान्यांना भरणे अवघड आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर बाबीची दखल घेवून लॉकडाऊन काळातील महावितरणचे विजदेयके माफ करण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.
नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी हे गाव ५००० लोकवस्तीचे असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना प्रती महिना सरासरी एक हजार, दोन हजार अशी अवाजवी बिले आली आहेत. राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाले होते. सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्याने रोजगार बुडाले आहेत. परिणामी, पैशाचे दैनंदिन व्‍यवहार ठप्प झाले होते. परिसरातील अनेक गावांत मीटरचे रिडींग न घेता ॲव्‍हरेज बीले देण्यात आली. एकावेळेसच अव्‍वाच्याा सव्‍वा बिल आल्याने सर्वसामान्य शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. परिसरातील शेतकरी हे महावितरणचे देयके भरू शकत नसल्याने विज बिल माफ करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी वेळोवेळी शासनस्तरावर लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या गंभीर प्रश्‍नाबाबत प्रशासन काय भूमिका घेतात? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सर्वत्र व्‍यवहार ठप्प पडले आहेत. परिसरातील अनेकांना रोजगार नसल्याने आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अशात शेतकरी कोरोनामुळे सर्व बाबतीत मेटाकूटीस आला आहे. कर्ज काढून पीक आलेले नाही, अशी स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची आहे. यातच महावितरणने विजबिलाचा दिलेला शॉक विवंचनेत पाडणारा आहे. या प्रश्‍नावर प्रशासनाने नियोजजन करून उपाययोजना करण्याची गरज आहे.
-बाळासाहेब पन्नासे
सरपंच, ग्रामपंचायत शिरसगाव पां.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.