राजुरा प्रतिनिधी- (घनशाम मेश्राम)
राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जागतिक आदिवासी दिनी राजुरा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी जंगोदेवी व भिवसन देवाची पूजा अर्चा करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
जंगोदेवी व भिवसन हे देव आदिवासींचे आराध्य दैवत असून आदिवासी बांधव जंगोदेवी व भिवसन देवाला मानतात आणि निसर्गाचे प्रतीक या देवांना मानतात. जंगोदेवी ची निशाणी तयार करतांना आदिवासी बांधव झाडाला न तोडता देवीची निशाणी त्या झाडातून कोरून काढतात यावरून आदिवासींची निसर्गाप्रती किती अभिमान व प्रेम आहे हे या परंपरेतून दिसून येते. आणि ही परंपरा आजही कायम आहे.
या परंपरे चे जतन करण्यासाठी बामनवाडा येथील आदिवासी बांधव जंगोदेवीचे स्थळी जंगोदेवी व भिवसन देवाच्या निषानीची पुनर्स्थापना केली. या वेळी सामजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके, गणेश कोडापे, मारोती टेकाम चित्रांगण कोवे, आडे सर, मारुबाई कुळसंगे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी covid -19 चे नियमावलीचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.