Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २९, २०२०

अँक्वा लाईन मार्गीकेवर ७ व्या क्रमांकाचे मेट्रो स्टेशन तयार


बंसी नगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेच्या दृष्टीने सुसज्ज



नागपूर २९ ऑगस्ट:* अँक्वा लाईन मार्गीकेवरील बंसी नगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले असून, लवकरच नागरिकांना या स्टेशन हुन मेट्रोने प्रवास करता येणार आहे. बंसी नगर अँक्वा लाईन मार्गीकेवरील ७ व्या क्रमांकाचे मेट्रो स्थानक आहे. सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर दरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. या स्थानकांची नावे या आहेत प्रमाणे - लोकमान्य नगर, बंसी नगर, वासुदेव नगर, रचना रिंग रोड, सुभाष नगर,अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी स्क्वेअर, शंकर नगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी इंटरचेंज असे या सर्व स्टेशनची नावे आहेत.



कोरोनामुळे सध्या मेट्रो सेवा थांबली असली तरीही या ११ स्थानकांपैकी लोकमान्य नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी स्क्वेअर आणि सिताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशनवरून प्रवासी वाहतूक या आधीच सुरु झाली आहे.

स्टेशनलगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. महत्वाचे म्हणजे वाढत्या शहरासोबतच, नागपुरातील रहिवासी भाग देखील वाढला आहे गेल्या काही वर्षात हिंगणा मार्गाच्या दोन्हीही बाजूला रहिवासी संकुलांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याने या भागातील लोकसंख्या वाढली आहे. यामुळे या मार्गावर नोकरी, शिक्षण किंवा उद्योगाच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या तसेच येथील रहिवाश्यांना या मेट्रो स्टेशनचा नक्कीच फायदा मिळणार आहे.

*बंसी नगर मेट्रो स्टेशन:* बंसी नगर मेट्रो स्टेशनची उभारणी ५८००. ०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली असून, स्टेशन च्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

*बंसी नगर मेट्रो स्टेशनची वैशिष्ट्ये:* १) आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक,२) स्टेशन च्या छतावर (टेरेस) सौर पॅनेलची व्यवस्था, सौर पॅनेल निर्मित वीज थेट ग्रीडमध्ये येणार, यामुळे कमी होणार ऑपरेशन खर्च,३) ग्रीन बिल्डिंगच्या नियमांनुसार बायो डायजेस्टरने सुसज्ज,४) स्टेशनच्या दोन्ही बाजूने पायऱ्या, एस्केलेटर व्यवस्था यामुळे ग्राउंड फ़्लोअर ते कॉनकोर्स आणि कॉनकोर्स ते प्लॅटफॉर्मवर दरम्यान चढणे किंवा उतरणे सहज शक्य, ५) दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,६) अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, ७) कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, ८) रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरता तरतूद, ९) दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, १०) लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), ११) कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, १२) संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.