एकूण सक्रिय बाधित 156
गडचिरोली/ प्रतिनिधी
आज जिल्हयात एकावेळी गडचिरोली, अहेरी, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील मिळून 25 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यतील 12 पोलीस जवान तर अहेरी येथील 10 जणांचा समावेश आहे. तसेच आज वेगवेगळया तालुक्यांमध्ये नवीन 23 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये कोरची तालुक्यात 12 सीआरपीएफ जवानांसह पोलीस कॉलनीतील पोलीस कर्मचाऱ्याचा 4 वर्षाचा मूलगा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी असे 14 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. तसेच गडचिरोली तालुक्यात एकूण 3 बाधितांमध्ये 1 वाहतूक पोलीस कर्मचारी, जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झालेला ॲनिमिया रूग्ण तर राज्याबाहेरून आलेली 53 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच देसाईगंज येथील 2 बाधितांमध्ये 1 आर्मी जवान सुट्टीवरती आलेला आहे तो कोरोना बाधित आढळून आला तसेच दिल्ली येथून आलेला मिलचा मिस्त्रीही विलगीकरणात होता तो कोरोनाबाधित आढळून आला आहे. यानंतर धानोरा येथील 2 यामध्ये 1 सीआरपीएफ व नागपूर वरून आलेला एक प्रवासी, चामोर्शी येथील एकजण ठाणे येथून आलेला होता तो बाधित आढळून आला. तर आरमोरी येथील एक व्यक्ती ब्रहमपुरी येथून प्रवास करून आलेला बाधित आढळून आला. अशाप्रकारे आज नवीन 23 जणांची नोंद जिल्हयात झाली.
यामूळे जिल्हयात कारोनामुक्त रूग्णांची संख्या 594 झाली तर सक्रिय 156 रूग्ण राहिले. आत्तापर्यंत बाधित संख्या आजच्या 23 नवीन बाधितांमुळे 751 झाली.