Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०४, २०२०

काँग्रेस नेते व माजी आमदार रामरतन बापू राऊत यांचे निधन



गोंदिया जिल्ह्यातील आदिवासींचे खंबीर नेतृत्व हरपले


देवरी तालुक्यात पसरली शोककळा


संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 4 मे 2020
नवेगावबांध:- गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस नेते, आदिवासी समाजाचे खंबीर नेते व आमगाव देवरी विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार रामरतन बापु राऊत यांचे आज दि.04 मे 2020 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी बहेकार नर्सिंग होम गोंदिया येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 2.35 वाजता त्यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देवरी तालुक्यात व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात नागरिकात व विशेषतः आदिवासी बांधवात शोककळा पसरली आहे. ते मृत्यूसमयी 71 वर्षाचे होते. एक तडफदार काँग्रेस नेते व अभ्यासू, आपल्या मतदारसंघातील समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती होती.1978 ते 1985 मध्ये देवरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.1985 ते 1995 भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे सहसचिव होते. तसेच देवरी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. 2009 ते 2014 या कालावधीत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेत केले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मिनाबाई राऊत , माजी जिल्हा परिषद सदस्य, दोन मुले व एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.रामरतन बापू राउत यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा खंबीर नेता हरपला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या स्व गावी मोहांडी येथे जाऊन सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे अंतिम दर्शन घेतले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे , माजी जिल्हा परिषद सदस्य झासीलाल कटकवार, राजू काळे डॉ. देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 05 मे 2020 रोजी त्यांच्या स्वगावी मोहांडी चिचगड येथील स्थानिक मोक्ष धामावर सकाळी १०.३० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.