कुटुंबप्रमुखासमोर नवे आव्हाने..
राजुरा.. (चंद्रपूर )
(आनंद चलाख)...
कोरोना दहशतीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. भारतातही 21 दिवसाचे लाकडावून घोषित झाल्यानंतर मजूर, कामगार, छोट्या व्यावसायिकांसमोर कुटुंबाचा भार पेलण्याचे नवे आव्हान समोर आले. संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्यामुळे दररोजच्या कामावर जगणाऱ्या कुटुंबांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दररोजच्या मिळकतीवर घर चालविणाऱ्या कुटुंबप्रमुखाचा समोर जगावे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र विपरीत परिस्थितीतही जगण्यासाठी संघर्ष अपुला असे म्हणत राजुरा येथील संजय कार्लेकर यांनी परिस्थितीला हार न मानता हात ठेल्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे.
संजय कार्लेकर याचे शहरात चहाटपरी व झेरॉक्स सेंटरचे दुकान आहे. घरी चार विवाहित भाऊ व त्यांचे कुटुंबातील सदस्य सर्व एकत्र राहतात . कुटुंबातील सर्व भार कुटुंबप्रमुख वर आहे. घरातील सर्व खर्च हा व्यवसायांवर आधारित होता .दररोजच्या उत्पन्नातून सर्व घरदार चालत होते. मात्र कोरोणाच्या दहशतीमुळे देश लाकडाऊन झाले. व्यवसाय बंद झाले. घरात येणारी मिळकत बंद झाली. दुरच्या नदीतून मच्छिमारी करून शहरात मासे विकण्यासाठी वेळेचे बंधन आले. वेळेचे बंधन आल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय ही संकटात आला. सायंकाळी पाच वाजताच्या नंतर मार्केट बंद होतो. त्यामुळे दूरवर मासेमारी करून बाजारात येईपर्यंत वेळ निघून जातो. अनेकदा मासे विक्री न झाल्यामुळे फेकून द्यावे लागतात. कोरोणा मुळे सर्व परिस्थिती बदललेली आहे. गरीब कुटुंबांसमोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे प्रश्न होते राजुरा येथील संजय कार्लेकर यांचे .
मात्र परिस्थितीला आव्हान देत जगण्यासाठी संघर्ष अपुला असे म्हणत संजय कार्लेकर याने आपला व्यवसाय बदलला. दररोज कुटुंब चालवण्यासाठी येणारा खर्च पाणी काढण्यासाठी संजय कार्लेकर याने ढकलगाडी वर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परिस्थितीला त्यांनी हार मानली नाही. हे दिवस बदलतील या आशेवर तो काळाशी संघर्ष करतोय.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देश हतबल झालेला आहे. देशात लाकडाऊन सुरू आहे. संपूर्ण रस्ते निर्मनुष्य आहेत. शहरासोबत खेडेगावात गावबंदी झालेली आहे. सर्व व्यवसाय टप्पा आहेत. यामुळे मजूर, रोजंदारी काम करणारे कामगार, छोटे व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दिवसभराच्या मिळकतीतून कुटुंब चालविणाऱ्या कुटुंबप्रमुखाचा समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. लाकडावून मुळे छोटे व्यवसाय बंद आहेत. चहाची टपरी, पानठेले ,ड्रायक्लीनर्स, प्रेस चे दुकान, झेरॉक्स सेंटर यासारखे छोटे व्यावसाय कुलूप बंद आहेत. त्यामुळे दररोजची मिळकत बंद झालेली आहे. मात्र कुटुंबातील गरजा पूर्ण करताना आर्थिक भार वाढलेला आहे. बाहेर व्यवसाय करणे कठीण झालेले आहे. ही व्यथा शहरातील अनेक कामगारांची व छोट्या व्यावसायिकांची आहे. कोरोना मुळे अनेकांच्या जीवनात आव्हाने निर्माण केली आहेत. मात्र डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेत जगण्यासाठी आपला संघर्ष सुरू ठेवलेला आहे.