ललित लांजेवार/नागपूर:
नागपूरवरून उच्च शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेल्या एकूण ३७ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मलेशियाला अडकून पडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी नागपूर येथील असून ते एका खाजगी करिअर संस्थेच्या माध्यमातून मलेशियाला प्रशिक्षणासाठी गेले होते. मात्र चीनवरून निघालेल्या कोरोनाने संपूर्ण जगभराला लॉकडाउन करायला भाग पडल्याने नागपूरच्या या ३७ विद्यार्थीना मलेशियाच अडकून बसण्याची वेळ आली आहे.

यात एकूण ३७ विद्यार्थी असून ३० मूल व ७ मुलींचा समावेश आहे. मलेशियातील पनाम शहरात व मेन मलेशियात हे विद्यार्थी वास्तव्यास आहेत,मलेशियात १४ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत लॉकडाउन होते. मात्र हा लॉकडाउन वाढून संपूर्ण १ महिना म्हणजे १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असणार आहे, अश्या परिस्थितीत विद्यार्थी राहत असलेल्या हॉटेल देखील मलेशिअन सरकारने खाली करायला लावल्याने त्यांना जवळपासच्या परिसरात फ्लॅट करून राहावे लागत आहे.
या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थीनी भारतीय दुतावासात संपर्क केला व भारतात परतण्यासाठी विनंती केली,मात्र मलेशिया सरकारनी त्यांना परवानगी नाकारली, त्यामुळे कोरोनामुळे शिक्षणासाठी गेलेल्या नागपूरच्या विद्यार्थ्यांना देखील मलेशियात त्रास सहन करावाला लागत आहे.
तिथल्या वाढत्या महागाईने विद्यार्थ्यांन जवळचे पैसे देखील संपले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानउड्डाण बंद असल्याने परदेशातून येणे किव्हा जाणे शक्य नाही. तसेच जेवणाची सोय व इतर सोई सुविधांचा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडीओच्या माध्यमातून भारतात परत येण्याची विनंती केली आहे,हा व्हिडिओ मलेशियात अडकलेल्या विद्यार्थीच्या पालकांनी नागपुरात फेसबुकवर शेअर केला आहे.