मूळ नागपूरकर असलेले सध्या पुणे येथील ए एफ एम सी (arms forces medical college) येथे वैज्ञानिक पदावर कार्यरत डॉ. विवेक अंबाडे यांनी सामाजिक भान जपत मिळणाऱ्या वेतनातून एक लाख रुपयाचा निधी पी एम केअर्स फंड मध्ये आपले कर्तव्य म्हणून सुपूर्द केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीसाठी भारतीयांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे.
डॉ. विवेक अंबाडे यांनी कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन साठी दिलेला सहायता निधी निश्चितच तरुण पिढी साठी प्रेरणादायी असून समाजातील सर्व वर्गाने एकत्रितपणे येऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपले योगदान देण्याकरिता संवेदना जागवणारा आहे.
डॉ. विवेक अंबाडे यांनी बायो केमिस्ट्री या विषयात डॉक्टरेट मिळवली असून त्यांचे शिक्षण नागपूर येथे झालेले आहे. वैज्ञानिक म्हणून कार्यरत डॉ. अंबाडे यांनी वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाद्वारे आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला असून त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतीय लष्कर सेना तर्फे स्वातंत्र्यदिनी वर्ष 2010 आणि वर्ष 2019 मध्ये गौरव पदक देऊन सन्मानित केले आहे.
डॉ. विवेक अंबाडे यांनी कोरोनाच्या भीषण वास्तविकतेवर आपल्या निवेदनाद्वारे अत्यंत सूचक भाष्य केले आहे, केंद्र व राज्य सरकार कोरोना विरोधात प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. भारतीय जनतेने वेळीच याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर 137 करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सद्यस्थितीत उपलब्ध संसाधनाद्वारे कोरोनावर विजय मिळविणे कठीण होईल परिणामी जगात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या भारतात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, सरकारला सहायता करा अशी कळकळीची विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.
🌹🌹डॉ.विवेक अंबाडे, संपर्कध्वनी7020658808.