Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ११, २०२०

चंद्रपूर: तो पाय गॅंग्रिन बाधित महिलेचा?

 ऑर्थोपेडिक रुग्णालयाचा निष्काळजीपणा
 असू शकतो असा अंदाज  
चंद्रपूर/ललित लांजेवार:

सोमवारी तुकुम-दुर्गापूर रोडवरील लॉ-कॉलेज परिसरा जवळ झुडपातून महिलेचा गुडघ्यापासून खाली पायाचा भाग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.या घटनेनंतर चंद्रपुरात भीतीचे वातावरण तर तपास यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली होती.



अर्धा कापलेला व जळालेल्या अवस्थेत पाय मिळाल्यानंतर त्या पायांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ऑर्थोपेडिक रुग्णालयात मोडलेला पाय आणि त्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष याबद्दलची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी खबरबातला दिली.

पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले की,ऑर्थोपेडिक रुग्णालयात गॅंग्रिन व इतर आजारांमुळे एखाद्या रुग्णाला पाय कापावा लागला असेल व तो पाय नष्ट न करता रुग्णालय प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे तसाच झुडपी जंगलात फुकून देण्यात आला असावा,असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. याच सोबत पाय नष्ट करतांना रुग्णालय प्रशासनाला या बाबतचे प्रमाणपत्र देखील तयार करावे लागते. या बाबत अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
अश्या आजाराचा पाय संपूर्णपणे नष्ट करावा लागतो मात्र या घटनेत तसे न करता त्या महिलेचा पाय झुडपात फेकून देण्याचा आला. यासंदर्भात त्या संबंधित रुग्णालयाचा शोध घेण्याचे काम रामनगर पोलिसांकडून करण्यात येत असून शहरातील संपूर्ण परिसरातील रुग्णालयांना या बाबतची माहिती पत्राद्वारे देण्यात येणार असून त्यांच्याकडून रीतसर माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली.

या संदर्भात प्राथमिक तपासात हा निष्काळजीपणा कोणत्या रुग्णालयाकडून करण्यात आला याची खात्रीशीर माहिती न मिळाल्याने कोणत्याच रुग्णालयावर बोट उचलू शकत नसल्याचे हाके यांनी सांगितले. 

परिसरामध्ये अधिक तपासानंतर तो पाय कापण्यात येणाऱ्या अवजारासोबत मासाचे तुकडे देखील सापडले होते.या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरु आहे. 

कोरडे आणि ओले गॅंग्रिनमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कोरडा गॅंग्रिन हा थेरोस्क्लेरोसिस सारख्या परिस्थितीमुळे स्थानिक उतींना रक्तपुरवठा रोखण्याचा परिणाम आहे, तर ओले गॅंग्रिन संसर्गाचा परिणाम आहे.

रक्तपुरवठ्याअभावी शरीरातील एखादा भाग डेड होणे या सारख्या आजाराने होऊ शकते. ड्राय गॅंग्रिन आणि ओले गॅंग्रिन म्हणून गॅंग्रिनचे दोन प्रकार आहेत. ओला गॅंग्रिन तयार करणे किंवा ओले गॅंग्रिनमध्ये कोरड्या गॅंग्रिनचा विकास न केल्यास उपचार केले तर मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच, वैद्यकीय डॉक्टर सहसा गॅंग्रिन बाधित भाग कापून शरीरापासून काढून टाकण्याचे सुचवितात .असाच हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.