Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ११, २०२०

ओबीसी समाजाच्या जातनिहाय जणगणनेकरीता दिल्ली येथे 23 मार्च ला देशव्यापी धरणे


चंद्रपूर (प्रतिनिधी): 
ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरीता लोकसभा बजेट शेसन दरम्यान देशव्यापी धरणे आंदोलन दि. 23 मार्च ला दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर होत आहे.
    ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेवुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची 25 डीसेंबर 2018 ला दिल्ली येथील ए.पी. भवन येथे देशातील सर्व ओबीसी संघटनांची मिळून बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जस्टीस ईश्वरैय्या, महासचिव सचिन राजुरकर, तेलंगणाचे श्रीनिवास गौड, आंध्रप्रदेशचे शंकर नारायण, अमेरीकेचे हरी इपन्नापल्ली, पंजाबचे इंद्रजित सिंग, दिल्लीचे हंसराज जांगीड,  मध्यप्रदेशचे विनय कुमार, तथा विविध राज्यातील विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
              या बैठकीत केन्द्र सरकारला ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरीता निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 20 जानेवारी 2020 ला देशभरात धरणे आंदोलन घेण्यात आले. लोकसभा बजेट शेसन दरम्यान धरणे आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार येत्या 23 मार्च रोजी दिल्ली येथील  जंतर-मंतर वर देशपातळीवरील धरणे आंदोलन आयोजित केले आहे. 
                या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास फेडरेशन, तेलंगणा स्टेट बॅकवर्ड क्लास वेलफेअर असो., आंध्रप्रदेश स्टेट बॅकवर्ड क्लास असो., ओबीसी महासभा मध्यप्रदेश, विश्वकर्मा समाज न्यू दिल्ली, पिछडा महासंघ, कानपुर व देशातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होत आहे. 
                या देशव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जस्टीस ईश्वरैय्या, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, कार्याध्यक्ष खुशाल बोपचे, महासचिव सचिन राजुरकर, हेमेंद्र कटरे, बबलु कटरे, सुषमा भड, आदींनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.