I. T. I. चे प्रशिक्षण व महत्व समजून घेणे काळाची गरज
दहावीनंतर विद्यार्थी पालक पहिल्यांदा सायन्ससाठी प्रयत्न करतात. तेथे प्रवेश शक्य नसेल तर मग कॉमर्स, आर्ट्स शाखेचा विचार केला जातो. त्यानंतर पसंती दिली जाते ती डिप्लोमा कोसेर्सना. आणि अगदीच कुठे प्रवेश मिळाला नाही तर मग अगदी नाईलाजाने आयटीआय चा विचार केला जात होता. पण इतर कोणत्याही शाखे ईतक्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक संधी आयटीआयद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासतेय. मागणी वाढत असली तर त्याप्रमाणात कुशल कामगार मिळणे अवघड जात आहेत.
त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी चालून आल्या आहेत. शिवाय आयटीआय झाल्यानंतरही इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्यायही विद्यार्थ्यांसमोर खुला आहेच. आयटीआय केल्यानंतर नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचार विद्या करु शकतात. इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये बदल केले आहे. इंडस्ट्रीसोबत टाय-अप करुन नव्या नव्या योजना हाती घेण्यात येत आहेत.
जर कमी पर्सेंटेज मिळालेल्या विद्यार्थीना ITI ला प्रवेश घेतला,तर तो आपली आवडती फिल्ड निवडून दोन वर्षीय किंवा एक वर्षीय कोर्स केल्यानंतर त्याचा पाया मजबूत होतो,टेक्निकल क्षेत्रात त्याचा आत्मविश्वास वाढतो. जर त्यांनी दोन वर्षाचा ITI चे शिक्षण घेतले असेल तर त्याला थेट पाँलिटेक्निकला दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळते, आणि पाया मजबूत असल्यामुळे त्याचां आत्मविश्वास वाढत जातो,आणि सतत त्याला यश मिळत जाते. आणि पहिले तो पॉली मग डिग्री प्राप्त करून तो इंजिनियर होतो व इंजिनियर म्हणून चांगल्या पदावर कार्यरीत राहतो.जे लोक ITI ला कमी दर्जाचे शिक्षण समजतात, त्यांनी हा न्युनगंड मनातून काढून टाकावा आणि पाल्याने सुद्धा ITI चे महत्व समजून घेतला,तर आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करता येईल. कमी पर्सेंटेज मिळाले म्हणून त्याला तांत्रिक शिक्षणा पासून वंचित करू नये. सुरूवात ITI पासून करावे.आता ITI ला NSQF म्हणजे नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेम वर्क चा दर्जा मिळालेला,असून पास झालेला प्रशिक्षणार्थीचे स्किल भारतात व भारताबाहेर सारखीच असल्यामुळे तो आता विदेशात सुद्धा जॉब करू शकतात.
इलेक्ट्रिशयन, इलेक्ट्रॉनिक, फिटर, डीझल मेकॅनिकल, वेल्डर यासारख्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून देणार्या अभ्यासक्रमाने देशातील लाखो युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. या अभ्यासक्रमाच्या मदतीने एखाद्या मोठ्या कंपनीत कुशल तंत्रज्ञ म्हणून काम करू शकतो किंवा स्वत:चा व्यवसाय देखील सुरू करू शकतो. त्यामुळे या अभ्यासक्रमाला नेहमीच मागणी राहिली आहे. मुलींना देखील आय.टी.आय.मध्ये पूरक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. मात्र, ज्यांना नोकरी लवकर हवी असेल, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
अभ्यासक्रम कोठे उपलब्ध
आय.टी.आय.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सरकारी आणि खासगी नोकरीसाठी सहजपणे अर्ज करता येतो. या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड असतात. आय.टी.आय.चे देशभरात सरकारी आणि खासगी संस्था, कॉलेज आहेत. तसेच विद्यापीठातही विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. ऑनलाईनवर कॉलेज, शिक्षण संस्थांची माहिती मिळू शकते. गुणवत्तेनुसार ट्रेड मिळतो. अर्जात ट्रेडचे पसंतीक्रमांक द्यावे लागतात. गुणांनुसार ट्रेड मिळतो.
उमेदवार आपल्या आवडीनुसार कोणताही ट्रेड निवडू शकतो आणि आय.टी.आय.चा डिप्लोमा प्राप्त करू शकतो. विशेष म्हणजे सर्वच ट्रेड सर्व आय.टी.आय.मध्ये उपलब्ध नसतात. आपल्या आवडीचा अभ्यासक्रम संबंधित संस्थेत आहे की नाही, त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. कोणत्या संस्थेत कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कालावधी देखील अभ्यासक्रमानुसार निश्चित केलेला असतो. एक वर्ष, दोन वर्ष याप्रमाणे अभ्यासक्रमाचा कालावधी असतो.
जर आपल्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मात्र, खासगी संस्थेतून आय.टी.आय. अभ्यासक्रम करत असाल तर त्यांच्या नियमानुसार शुल्क भरावेच लागेल. आय.टी.आय.साठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनी पात्र ठरतात.
आय.टी.आय. डिप्लोमा/सर्टिफिकेट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी कोठे मिळेल, हा प्रश्न असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्यासमोर नोकरीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अनेक सरकारी संस्थांत दरवर्षी जागा निघतात आणि त्यांना आय.टी.आय. डिप्लोमाधारक उमेदवार हवे असतात. म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराचा फारसा प्रश्न राहत नाही.
सार्वजनिक ठिकाणी रोजगाराची संधी
खासगी क्षेत्रात नोकरीची संधी
स्वयंरोजगार
आय.टी.आय. अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. अशा व्यवसायासाठी सरकारी दरबारी प्रोत्साहन देण्याबराबेरच अनुदान आणि कर्जही दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लघू, मध्यम उद्योगांना कर्जाची सोय केली जाते.
NSQF चे प्रशिक्षण काय आहे!
हे,पालकाने समजण्याची गरज आहे.या करीता पालकाने मुलाला ज्या ITI मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या ITI चे पूर्ण माहिती करणे गरजेचे असते. म्हणजे ज्या प्रशिक्षण संस्थेत NSQF च्या दर्जेनुसार सम्पूर्ण मशीन अभ्यासक्रम व प्रात्येशिक व पूर्ण तास ITI होते कि नाही, याची सुध्या शहानिशा करणे गरजेचे आहे. पालकांनी जर सतर्क होऊन जर ITI ची निवड करून आपल्या मुलाला प्रवेश दिला तर,नक्की त्यांच्या मुलांना चांगले प्रशिक्षण मिळू शकेल व त्यांना रोजगारापासून कोणी वंचित करू शकणार नाही, तरच तुम्ही आपल्या मुलांचे आयुष्य उज्वल करू शकाल.
प्रवीण लांजेवार(चंद्रपूर)
ईलेट्रीकल इंन्स्ट्रक्टर
साई ITI चंद्रपूर