Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

वैशाली येडेसाठी उमरेड व भिवापूर शहरातून मदत निधी

 

यवतमाळ-वाशीम मतदार संघातील उमेदवार 

नागपूर/प्रतिनिधी 

निवडणुका म्हंटल कि सहमतदारांची चंगळ हॉटेल, ढाबे, बिअर बार, येथे जेवणासाठी व पिण्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी सर्वत्र धडपड दिसते.परंतु प्रहार जनशक्ती पक्षचा उमेदवारासाठी गल्लोगल्ली,बाजारात फिरून शेतकरी कस्टकरी दिव्यांगाचे कामगार व जनसामान्यांचे कैवारी आ.बच्चू कडू यांनी दिलेल्या यवतमाळ-वाशीम मतदार संघातील वैशाली ताई येडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांनाची पराकाष्टा करणारे कार्यकर्ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड भिवापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने यवतमाळ-वाशीम लोकसभा माताडर संघातून आ.बच्चू बहू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील भगिनी यांना उमेदवारी दिली असून उमरेड भिवापूर तालुक्यातून निधी उपलब्ध करून आर्थिक मदत करण्यात आली. व्यवसायिक  दुकानदार व शेतकरी कस्टकरी व विद्यार्थ्यांनी आप आपल्या परीने हातभार लावला. सात वर्षपूर्वी वैशाली ताई चा अल्प भूधारक शेतकरी पतिने कर्ज व नापिकी मुळे आत्महत्या केली पतीचा दुर्देवी निधनाने खचून न जाता त्यांनी परिस्थितीचा मुकाबला केल अंगणवाडी मदतनीस म्हणून तुटपुंज्या मानधनावर त्या काम करतात परंतु गरिबीची जाण असणाऱ्या वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे.त्यांची खरी लढत शिवसेनेचे चा प्रस्थापित भावनाताई गवळी व काँग्रेस चे माणिकराव ठाकरे यांच्याशी आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.