Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २८, २०२०

पाठ्यपुस्तकातील एका पाठाने ‘ती’ला बनविले हॉकीपटू





- मुलगा बनला वेटलिफ्टर
- ती देते निशूल्क प्रशिक्षणाचे धडे


क्रीडा दिन विशेष
प्रतिनिधी सतीश बाळबुधे
यवतमाळ : शालेय जिवनात अनेक शिक्षण घेतात. शिक्षण घेतांना अनेक संत, महात्म्य, क्रीडा विश्वात नाव कमविलेल्या दिग्गजांचे पाठ आपण गिरवितो. पाठ शिकतांना पाठातील महात्म्याचे आदर्श घेण्याचे उदाहरण क्वचितच आढळते. अशाच यवतमाळ येथील एक महिला शालेय जिवनात पाठ्यपुस्तकातून मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घेत हॉकीपट्टू बनली. एवढेच नव्हे तर तीने चक्क शेकडो विद्यार्थ्यांना हॉकीचे निशुल्क प्रशिक्षण दिले. इतक्या वर ती न थांबता स्वत:च्या मुलाला क्रीडा क्षेत्रात वेटलिफ्टर बनविले. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिनी यांचा आदर्श घेण्याची इतराना आवश्यकता आहे.
मनीषा सुहास आकरे असे हॉकीपटू बनलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांनी आजपर्यंत विविध स्तरावर यवतमाळचे नावलौकीक केले आहे. त्यांची हॉकी खेळ खेळण्याची सुरुवात झाली ती वयाच्या १३व्या वर्षांपासूनच. त्यांनी स्वत:ला या खेळामध्ये इतके झोकून दिले की राष्ट्रीय हॉकी मिनी ऑलंपीक स्पर्धेत त्या महाराष्ट्राच्या हॉकीचमू मध्ये महत्व पूर्ण खेळाडू म्हणून सहभागी होत्या. भारतीय महिला चूल आणि मूल यामध्ये रमलेली अबला नसून ती जागतिक क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाची प्रतिमा उंचावत आहे. हे अनेक महिला खेळाडूंनी सिध्द केलेले आहे.
दहा वर्षांपासून मनिषा आकरे यवतमाळ शहरातील हॉकीपटूंना निशुल्क प्रशिक्षण देत आहेत. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने २९ ऑगस्ट क्रीडा दिनी मोठ्या प्रमाणात साजरा करून वर्षभर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गौरव देखील करतात. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन त्यांच्या अकदामीच्यावतीने करण्यात येते. हॉकी संघटनेच्या सब ज्यूनियरच्या कमिटीमध्ये सिलेक्टर म्हणून कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर यवतमाळ शहरातील एका चौकाला मेजर ध्यानचंद चौक हे नाव देण्यासाठी प्रयत्न देखील केले आणि यशस्वी झाल्या. मनिषा आकरे यांची हॉकी या खेळाबद्दलची तळमळ बघून अनेक नवोदित हॉकीपटू यवतमाळ शहरातून घडतील आणि यवतमाळचे नाव हॉकी खेळात नक्कीच मोठे करतील अशी आशा यवतमाळकर क्रीडा रसिक बाळगून आहेत.

मनीषा आकरे यांनी हॉकी खेळात केलेली कामगिरी
महिला हॉकी नॅशनल राची (झारखंड) येथील झालेल्या हॉकी स्पर्धेत त्या संघाच्या कर्णधार होत्या. शालेय स्तरावरील हॉकीच्या नॅशनल टीम मध्ये सुध्दा त्यांचा सहभाग होता. ज्यूनियर युनिव्हर्सिटी नॅशनल लेव्हल स्पर्धेत चार वेळेस सहभाग होता. महिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एअर इंडियाकडून ऑल इंडिया हॉकी फेडरेशन कप चे आयोजन बँकॉक मध्ये करण्यात आले होते. त्या चमू मध्ये मनिषा आकरे खेळाडू होत्या. एअर इंडियाच्या करार तत्त्वावर तीन वर्ष त्या खेळत होत्या. मनाशी बाळगलेली जिद्द त्यांना कुठे थांबू देत नव्हती त्यातून सुरुवात झाली यवतमाळ येथे हॉकी अकादमीच्या माध्यमातून अनेक हॉकीपटू घडविण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. बाबाजी दाते हॉकी अकादमीची खेळाडू कु. सायली वझाडे हिने वयाच्या १७ वर्षे वयोगटात शालेय महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात गोलकीपर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करीत इतिहासात यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदा रौप्य पदक प्राप्त करून दिले. त्यासाठी मनिषा आकरे यांनी प्रशिक्षक म्हणून खूप परिश्रम घेतले होते. विदर्भ हॉकी असोसिएशन तर्फे विदर्भाची सब ज्यूनियर मुलींची टिम हॉकी इंडियाची नॅशनल खेळायला आसाम कलियाबोर येथे गेली होती. त्यात यवतमाळच्या ६ मूली सहभागी झाल्या आणि त्या चमूच्या प्रशिक्षक म्हणून मनिषा आकरे यांची निवड णाली होतभ. पहिलयांदाच विदर्भाच्या चमूने इतिहास घडवत सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती.
---------------------------------


बघितले आणि शिकण्याची इच्छा झाली : देवांशू आकरे (वेटलिफ्टर)
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मात्र खेळाशी तिळमात्र संबंध नसलेला देवांशू आकरे तल्लख बुध्दीमत्तेचा विद्यार्थी अशी त्याची ओळख होती. १०वीत शिक्षण घेतांना आईनेच वेटलिफ्टींगकडे वळण्याचा सल्ला दिल्ला. आईच्या सल्ल्यानेच वेटलिफ्टींग सामने बघण्यासाठी गेला. सामने बघितल्यानंतर त्याला आपणही वेटलिफ्टींग शिकावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यानंतर जिम गाठून कोचींग क्लासेस करीत वेटलिफ्टींगचे धडे गिरविले. रात्रंदिवस मेहनत घेत आपले स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. स्वप्नाला मेहनतीची जोड मिळाल्यास काहीही शक्य होते हे त्याने सिध्द करून दाखविले. त्याने शालेय राज्य स्तरावर तीसरी रँक मिळविली. आणि संपूर्ण भारतात आंतरविद्यापीठ स्तरावर १० व्या क्रमांकावर होता. यासाठी तो दररोज मेहनत करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक खेळाडू घडू शकतात मात्र आई-वडिलांनी मुलांचे भविष्य म्हणून स्पर्धात्मक खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोण ठेवायला पहिजे असेही तो यावेळी म्हणाला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.