ओ माय फे्रंड गणेशा.....रहैना साथ हमेशा....
आशीष गोसावी यांनी साकारला श्रींचा ‘बालगणेश’ देखावा
सतीश बाळबुधे
यवतमाळ : बुध्दीदाता....सुखकर्ता....विघ्नेश्वर...अशा विविध नावरूपाने उदयास आलेल्या ‘श्रीं’ना सर्व देवी देवतांमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते. 10 दिवस भक्तीभावाने पूजा करून श्रींसाठी विविध देखावे, आकर्षक रोषणानाईतून श्रींचे आगमण थाटात करतात. शहरातील एका तरूणाने श्रींचे स्वागत करण्यासाठी काहीतरी कल्पक करण्याचे सूचले. ताळेबंदी असताना अनेक मंदिरे बंद होती. भाविकांना दर्शन घेण्यासाठी हेमाडपंती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. नंदीच्या मुखातून जलधारेसोबत श्री गणेश खेळताना साकारलेला देखावा दहा दिवस नागरिकांना आकर्षित करीत होता. दरम्यान, अनंत चतुर्थदशीला भजनपूजनासह श्रींना निरोप देण्यात आला. या जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी प्रार्थना देखील केली आहे.
यवतमाळ शहरालगत असलेल्या न्यू सिंघानिया नगर येथील आशिष गोसावी हे सजावट कलेत पारंगत आहेत. दरवर्षी ते श्रींच्या आमगणासाठी नवनवीन प्रयोग करीत असतात. यावर्षी चक्क त्यांनी नैसर्गीक देखाव्यातून आधुनिक पिढीला संदेश दिला. श्रींचे वाहन आणि मोषक पाण्यासोबत खेळतांना श्रींची आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. बालगणेश खूप जिद्दी होते. कुशाग्र बुद्धीमता. आणि शूरही होते. त्यांचे वाहन मुषक असण्यामागे अनेक अख्यायिका आहेत. आशिष गोसावी यांनी बालगणेशांचा पाण्यासोबत खेळतांना देखावा तयार करताना त्यांनी घरगूती साहित्याचा वापर केला. हा देखावा इतका आकर्षक केला की तो जीवंत असल्याचे अनेकांना भासले. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सगळे मंदिर बंद होते. त्या पार्श्वभूमीवर हेमाडपंती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. नंदीच्या मुखातून जलधारेसोबत श्री गणेश खेळताना साकारलेला देखावा कौतुकाचा विषय ठरत राहिला.श्री आपल्या गावी परतले असले तरी या जगावर कोरोनाचे भयानक संकट उभे आहे. या संकटातून मुक्तता करावी अशी प्रार्थना देखील त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कोरोनामुळे गेली तीन ते चार महिन्यांपासून मंदिरांना ताळे लागले होते. अनेकांना दर्शन घेता आले नाही. कल्पकतेतून घरगूती साहिल्याच्या उपयोगातून हेमाडपंती मंदिर व मुषकराजासोबत बाप्पा पाण्यात खेळतांना देखावा साकारला. हा देखावा दहा दिवस नाविण्यपूर्ण असल्याचा भास देऊन गेला.
- आशीष गोसावी
स्मार्ट होम इंटेरियर अॅण्ड एक्सटेरियर डेकोरेटर
8668994808