Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

नागपुरात तरुण पोलिसाचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी :
kavyashilp Digital Media
शुक्रवारी रात्री कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचाजागीच मृत्यू झाल्याची घटना जुना कामठी मार्गावरील रतन टॉवरसमोर घडली. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशाल लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते विनोबा भावेनगरात राहायचे जुना कामठी मार्गावरील रतन टॉवरसमोर त्यांच्या पल्सरला एका वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पहाटे २ ची वेळ असल्याने या भागात वर्दळ नव्हती. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसताच त्यांनी विशालला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस कर्मचारी नामदेव सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.
kavyashilp Digital Media


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.